14 सप्टेंबरला वाजत – गाजत निघणार चंद्रपूरचा राजा गणपतीची विसर्जन मिरवणूक

0
38

चंद्रपूर – 9 सप्टेंबरला चंद्रपूर शहरात बाप्पा ला निरोप देण्यासाठी हजारो नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती , मात्र यंदा च्या विसर्जन सोहळ्यात अनेक प्रकारचे विघ्न आडवे आले .
चंद्रपुरातील मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता , त्यानंतर गणेश मंडळातील सर्व कार्यकर्ते एकत्र येत ठिय्या आंदोलन केले . पोलिसांना चंद्रपूरचा राजा गणेश मंडळासमोर झुकावे लागले , लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबनाची कारवाई पोलीस अधीक्षकांनी केली , त्यानंतर ठिय्या आंदोलन समाप्त करण्यात आले होते . Jatpura yuvak ganesh mandal मात्र चंद्रपूरचा राजा गणपतीचे विसर्जन काही कारणास्तव होऊ शकले नाही . चंद्रपूरचा राजा श्री गणेश मूर्तीचा विसर्जन सोहळा 14 सप्टेंबर ला होणार आहे . अशी माहिती जटपुरा युवक गणेश मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे . Chandrapurcha raja सकाळी 11 वाजता चंद्रपूरचा राजा गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे , सर्वांचा लाडका बाप्पा चंद्रपूरचा राजा ला निरोप देत बाप्पाचे दर्शन घ्यावे असे आवाहन जटपुरा युवक गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here