सिएसटिपीएसच्या चुकिच्या धोरणाविराधोत यंग चांदा ब्रिगेड वीज कामगार संघटनेचे साखळी उपोषण

0
37

चंद्रपूर औष्णिक महाविद्युत केंद्रातील इलेक्ट्रिक विभागाचा कंत्राट प्रकिया वेळेत पुर्ण न केल्याने सदर विभागातील कर्मचा-र्यांवर बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. त्यामुळे सदर कंत्राट प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्यात यावी या मागणीसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामागार संघटनेच्या वतीने सिएसटीपीएसच्या गेट समोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.

या साखळी उपोषणात यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेचे अध्यक्ष हेरमन जोसेफ, उपाध्यक्ष प्रकाश पडाल, कार्याध्यक्ष नितिन कार्लेकर, अशोक ठाकरे, सुरेश ठाकरे, प्रविन झाडे, महेश मोडमवार, मुकंदा ठाकरे यांच्यासह ईतर कामगार सहभागी झाले होते.

इलेक्ट्रीकल विभागामध्ये काम करणारे 20 कंत्राटी कामगारावर या कामाच्या निविदा प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीचे सावट निर्माण होऊन कुटुंबीयांवर उपासमारीची  वेळ आली आहे. दिनांक 31 मे 2022 रोजी सदर कंत्राटच्या कामाचा कालावधी संपलेला होता. त्यानंतर पुन्हा निविदा प्रकाशित करून काम नियमित सुरु ठेवणे अपेक्षित होते. मात्र असे न करता अतिरिक्त मुदत वाढ करून  काम सुरु करण्यात आले आता 3 महिणे लोटूनसुद्धा अद्यापही सदर कामाची निविदा प्रकाशित करण्यात आलेली नाही. या उलट या सर्व कंत्राटी कामगारांना कुठलीही पुर्व सुचना न देता कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे या विरोधात आता यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. सदर कंत्राटाची प्रक्रिया पुर्ण करुन कामगारांना कामावर परत घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली असुन मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचा इशारा यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here