चंद्रपूर जिल्ह्यात या प्रकारे होत आहे सुगंधित तंबाखूची तस्करी

0
40

चंद्रपूर जिल्ह्यात mouth cancer चे प्रमाण झपाट्याने वाढले आहे , या जीवघेण्या कॅन्सरने अनेकांचा जीव घेतला मात्र अन्न व औषध प्रशासन विभाग आजही कुंभकर्णी झोपेत आहे . प्रतिबंधित सुगंधित तंबाखू ची तस्करी आता ट्रॅव्हल्स द्वारे होत आहे . अवैध प्रतिबंधित तंबाखू व गुटख्याची वाहतूक होत असल्याच्या माहितीच्या आधारावर सावली पोलिसांनी नाकाबंदी करून अवैध प्रतिबंधित तंबाखू व गुटखा गुरुवारी सायंकाळी जप्त केला . याप्रकरणी पोलिसांनी चालक तरकेश्र्वर साहू ( 43 ) रा . भेंडीकला जिल्हा राजनांदगाव छ . ग . 2 , वाहक बिर किशोर सूनानी ( 33 ) रा . रायपूर छ . ग , तुमेश कुमार साहू ( 28 ) रा . सुखी जिल्हा रायपूर छ . ग . यांच्यावर कलम 188 , 272 , 273 भादवी सह कलम 59 अन्न सुरक्षा मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला . या कारवाईत पोलिसांनी 32 हजार 266 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू पानमसाला व ट्रॅव्हल्स असा एकूण 15 लाख 32 हजार 266 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे . शासनाने सुगंधित तंबाखू गुटखा पानमसाल्यावर बंदी घातली आहे . तरीसुद्धा अनेकजण सुगंधित तंबाखूची तस्करी करून विक्री करत आहेत . ट्रॅव्हल्समधून सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली . त्यांनी आपल्या पथकासह गडचिरोली चंद्रपूर रोडवर नाकाबंदी केली . रायपूर ते चंद्रपूर जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रं सीजी 19 एफ 0833 ला थांबवून तपासणी केली . यावेळी ट्रॅव्हल्सच्या डिकीत राजश्री पान मसाला , विमल पानमसाला , इगल सुगंधित तंबाखू आढळून आला . पोलिसांनी सुगंधित तंबाखू व ट्रॅव्हल्स असा एकूण 15 लाख 32 हजार 266 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे .
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे , • ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स . फौ दादाजी बोलिवार , पोहेका दर्शन लाटकर , नापोका विशाल दुर्योधन आदींनी केली .

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here