*’भाऊचा दांडिया’ने वाढले सांस्कृतिक वैभव*

0
40

*खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार*

चंद्रपूर : समाजातील विविध प्रश्न आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी आपली लेखणी झिजवणाऱ्या चंद्रपूर शहरातील पत्रकारांचा चंद्रपूर सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नवरात्री उत्सवानिमित्त चंद्रपूर शहरात पहिल्यांदाच भाऊचा दांडिया आयोजित करण्यात आला असून, या सांस्कृतिक वैभव वाढवणाऱ्या कार्यक्रमाला चंद्रपूर शहरातील व्यापाऱ्यांनी देखील हजेरी लावली होती, त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी पत्रकार राजेश भोजेकर, संजय तायडे, प्रमोद काकडे, मझहर अली, पंकज मोहरीर, अरूण सहाय, संजय रामगिरवार, रवींद्र जुनारकर, प्रमोद उंदीरवाडे, मंगेश खाटीक, राजेश निचकोल, योगेश चिंधालोरे, रमेश काल्लेपल्ली, संजय तूमराम, आशिष अंबाडे, निलेश डहाट, सारंग पांडे, अभिषेक बटपल्लीवार, पवन झबाडे, प्रकाश हांडे, मिलींद दिंडवार, हैदर शेख, सुनील तायडे, राम सोनकर, अमित वेल्हेकर, बल्लू चव्हाण, अनिल ठाकरे, वैभव रुयारकर, मोंटू सिंग, गोलू बारहाते यांच्यासह व्यापारी मंडळातील राकेश टहलीयानी, चिराग नथवानी, अनिकेत टहलीयानी, रामकिशोर सारडा, प्रभाकर मंत्री, रामजीवन परमार तर चांदा क्लब, चंद्रपूर एक्झीक्युटीव सदस्य म्हणून किर्तीवर्धन दिक्षित, अशोक सिंघवी, मधुसुदन रुंगठा, विनोद दत्तात्रय, विरेंद्र हजारे, राजीव देवईकर, विनोद सिंह यांची उपस्थिती होती.

यावेळी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संगीत अमृतकर, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य – ठेमस्कर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शंतनू धोटे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्याम थेरे, महिला काँग्रेस नेत्या चित्रा डांगे, अश्विनी खोब्रागडे, माजी नगरसेवक सुनीता अग्रवाल, ओबीसी नेते उमाकांत धांडे, रेल्वे उपभोक्ता सलाहकर समिती सदस्य राज यादव, सेवादल महिला पदाधिकारी स्वाती त्रिवेदी, राधिका तिवारी – बोहरा, सामाजिक सामाजिक कार्यकर्ता बसंत सिंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेस युवा नेते कुणाल चहारे, काँग्रेस युवा नेते यश दत्तात्रय, पप्पू सिद्धीकी, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, सुरज बोबडे, सिलावार यांची उपस्थिती होती.

या खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘भाऊचा दांडिया’ उत्सवानिमित्त आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई दुचाकी, व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. चांदा क्लब ग्राउंडवर ५ ऑगस्ट २०२२ रोजीपर्यंत सायंकाळी सहा ते रात्रौ १० वाजता दांडियाची घूम राहणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी तथा मराठा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे..

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here