रविवारी शहरातुन निघणार महाकाली मातेची भव्य नगर प्रदक्षीणा पालखी.

0
34

आजपासुन चंद्रपूरात एतिहासीक महाकाली महोत्सवाला सुरवात झाली आहे. उद्या रविवारी सांयकाळी पाच वाजता महाकाली मंदिरातुन महाकाली मातेची भव्य नगर प्रदक्षिणा पालखी निघणार असुन हर हर शंभु गाण्याची सुप्रसिध्द गायीका अभिलिप्सा पांडा यांच्यासह अनेक आकर्षण या पालखीत असणार आहे. तरी नागरिकांनीही मोठ्या संख्येने या पालखीत सहभागी होण्याचे आवाहण श्री. माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

  1.     उद्या रविवारी शहरातुन निघणा-या महाकाली मातेची भव्य नगर प्रदक्षिणा पालखीसाठी माता महाकाली सेवा समीतीच्या वतीने भव्य नियोजन करण्यात आले आहे. सदर पालखीत हर हर शंभु गाण्याची सुप्रसिध्द गायीका अभिलिप्सा पांडा यांचा रोड शो असणार आहे. सोबतच 13 अश्व, अश्व आरुढ नवदुर्गांचे बोलके दृष्य,  अश्व आरुढ राणी हिराईचे बोलके दृष्य, श्री. माता महाकालीची चांदीची मूर्ती व पादुका, पालखीत अब्दागीरी व तूतारी, पोतराजे नृत्य, प्रधानमंत्री आणि उपराष्ट्रपती यांच्या कार्यक्रमात वादन करणारे राज्यातील प्रथम क्रमांकाचे 111 कलाकारांचे शिवगर्जना ढोल ताशा व ध्वज पथक, अश्वावर देवी देवतांचे साकारलेले बोलके दृष्य, नागपूर, चंद्रपूर, राजुरा येथील तिन ढोल ताशा पथक, दोन बॅंड पथक, गायत्री परिवाराचा 100 महिलांचा कळस समुह, 100 शंखनाथ महिलांचा समुह, १५० लोकांचे पाच लेझीम पथक, 100 महिलांचे ध्वजधारी पथक, 3 ध्वनी वादक पथक, पवनसुत प्रभु श्री बाहुबली हनुमान यांचे बोलके दृष्य, पुरुष / महिला दांडीया समुह, योग्य नृत्य परिवारातील १००१ पुरुष / महिलांचे योग नृत्य, 4 आदिवासी नृत्य, 1 लैंगी बंजारा समाज नृत्य, 100 मुला / मुलींचे कराटे प्रात्याक्षिक दृष्य, 80 वादकांसह जगदंब ढोल पथक, शिवाज्ञा वाद्य पथक यांच्यासह इतर धार्मीक सांस्कृतीक आणि सामाजिक देखाव्यांचा सहभाग असणार आहे. तरी सदर पालखी सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण कार्यक्रमाचे संयोजन आमदार किशोर जोरगेवार आणि माता महाकाली सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here