निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचा शेकडो लोकांनी घेतला लाभ भाजपाच्या वैद्यकीय व झोपडपट्टी मोर्चाचा उपक्रम

0
28
महानगर भाजपा जनसेवेत मग्न

भारतीय जनता पार्टी महानगर अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय आघाडी व झोपडपट्टी सेलच्या वतीने इंदिरा नगर येथे निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवारी करण्यात आले.

यावेळी,भाजपा जिल्हाध्यक्ष(श)डॉ. मंगेश गुलवाडे,डॉ. यशवंत कन्नमावर,डॉ. शंकर तोकला,वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. किरण देशपांडे,डॉ. वाढई यांनी किमान 230 नागरिकांची तपासणी करून त्यांना वैद्यकीय सल्ला देण्यात आला.डॉ किरण देशपांडे व महानगर सचिव रामकुमार अकापेलीवार यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या या शिबिरात भाजपा नेते दिनकर सोमलकर,महेंद्र जुमडे,
आकाश मस्के ,रिंकू वर्मन
कदमबिनी हवलदार,जयश्री पचारे,अल्फीत रोहनकर
सौरभ जिल्हेवार,अमन धारुडे,समय चौधरी,विशाल रॉय,सुरज सरकार,शिलानंद रामटेके,सचिन पोहनकर यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना डॉ गुलवाडे म्हणाले,भारतीय स्वातंत्र्यांचे हे अमृत महोत्सवी वर्ष असून महानगर भाजपा तर्फे कॅबिनेट मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात विविध सेवा उपक्रम राबविले जात आहे.आरोग्य तपासणी हा त्यातील एक प्रकल्प असून शेवटच्या माणसाची सेवा करण्याचा भाजपाचा संकल्प आहे.नागरिक सुदृढ असतील तर देश सुदृढ राहील असे ते म्हणाले. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रक्तदाब,मधुमेह,सर्दी व इतर आवश्यक तपासण्या केल्या,.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here