02 ऑक्टो 2022– राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आम आदमी पक्षाच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार जी, निवडणूक प्रभारी नागेश्वर गंडलेवार जी, कोषाध्यक्ष आसिफ शेख जी तसेच पक्षाच्या शहर, महिला व युथ विंग च्या पदाधिकाऱ्यांकडून महापुरूषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी म.गांधी व शास्त्रीजी यांचे आदर्श विचार आपल्या जीवनात रुजविण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात काही पदाधिकाऱ्यांकडून गांधीजी व शास्त्रीजी यांचे जीवन व त्यांचे विचार यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसह गांधीजींच्या पुतळ्याजवळ जाऊन माल्यार्पण करण्यात आले. यावेळी एका शिक्षित युवकाने पक्षासाठी काम करण्याची इच्छा व्यक्त करून पक्षप्रवेश केला. कार्यक्रमाची शेवट भारत माता, गांधीजी व शास्त्रीजी यांच्या नावाच्या जयघोष करून करण्यात आली. या कार्यक्रमास पक्षाचे शहर,महिला व युथ विंग चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793