- *राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांच्या प्रयत्नाला यश.*
*तब्बल १२ कोटी ९१ लाख ६८ हजार १०० रुपयांच्या योजनेला डीडब्ल्यूएसएम बैठकीत मंजुरी.*
चंद्रपूर :- तहसील जिल्हा चंद्रपूर येथील ग्रामपंचायत दुर्गापुर गावाची लोकसंख्या २६ हजार च्या वर असून दुर्गापूर येथील सद्यस्थितीत ६ लाख २५ हजार लिटर पाणी क्षमता असलेल्या जुन्या पाण्याच्या टाकीचे पाणी सतत वाढत असलेल्या लोकसंख्येला अपुरा पडत असल्याने दुर्गापूर येथे वाढीव पाणी चे टाकीचे बांधकाम आवश्यक होते व म्हणून राज्याचे तत्कालीन पाणीपुरवठा राज्यमंत्री मा. श्री. संजय बनसोडे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांनी प्रत्यक्ष भेटून दि. ०९ / ०६ / २०२१ ला वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करणे बाबत पत्र दिले होते.
त्या अनुषंगाने मा. राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी मा. अभियान संचालक, जलजीवन अभियान यांना निवेदनात नमूद “अ” च्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करावी अशा प्रकारचे लेखी निर्देश दिले होते.
या निर्देशानंतर महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अभियान संचालक मा. डॉ. ऋषिकेश यशोद यांनी दिनांक २२ जुलै २०२१ ला मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना जल जीवन मिशनच्या मार्गदर्शक सूचनानुसार उचित कारवाई करणे बाबत पत्र पाठवले होते, त्यानंतर सदर पाणीपुरवठा योजनेला प्रस्तावित करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने दुर्गापूर गावाचा सर्वेक्षण करून डीपीआर तयार करण्याकरिता खाजगी एजन्सीला विभागानी कंत्राट दिले होते. परंतु सजर एजन्सीला सर्वेक्षण करण्याकरीता लागणारा खर्च हा जवळपास ३ लाख ४४ हजार एवढा असल्याने मा. कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चंद्रपूर यांनी सदर निधीची मागणी ग्रामपंचायत दुर्गापूर ला केली होती.
ग्रामपंचायत दुर्गापुर कडे आर्थिक तरतूद नसल्याने नितीन भटारकर यांनी सदर सर्वेक्षणीकरिता लागणारा निधी जिल्हा खनिज प्रतिष्ठान मधून द्यावा याबाबतचे लेखी पत्र तत्कालीन पालकमंत्री मा. विजय वडेट्टीवार यांना दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ ला दिले होते.
त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर पत्र क्रमांक साशा / कार्या-११/ जि. ख. प्र./ २०२२/ ३४५ दिनांक २८ /०३ /२०२२ ला सर्व्हेक्षनकरिता लागणाऱ्या निधीची प्रशासकीय मान्यता घेऊन ३. ४४ लक्ष रुपये जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर अंतर्गत वितरित करण्यास मंजुरी मिळाली.
सर्वेक्षना करिता निधी मंजूर झाल्यानंतर सदर एजन्सीने प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेला डीपीआर मध्ये ३ एम.एल.डी. च्या वॉटर ट्रीटमेंटसह ७ लक्ष ५० हजार लिटर क्षमता असलेल्या पाणी टाकीच्या बांधकामासह इतर कामांचा खर्च हा १२ कोटी ९१ लाख ६८ हजार १०० रूपये एवढा दिला होता.
सदर खर्च हा ५ कोटी रुपयांनी अधिक असल्याने कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्याकडे वर्ग केलेला होता. सदर योजना मोठी असल्याने सदर योजनेला जिल्हास्तरीय पाणी व स्वच्छता मिशन ची मंजुरी लागत होती. परंतु जिल्हा कार्यालय येथे प्रस्ताव येऊन अनेक दिवस झाले असल्याने तात्काळ बैठक घ्यावी याकरिता दिनांक १७/०८/२०२२ ला नितिन भटारकर यांनी मा. जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून लेखी निवेदन दिले व तात्काळ बैठक घेऊन सदर योजनेला मंजुरी द्यावी अशी मागणी केली होती.
या अनुषंगाने दिनांक ०५ सप्टेंबर २०२२ ला पाणीपुरवठा योजनांच्या कामास मा. अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली होती व त्यात जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेकडे रुपये ५ कोटी पेक्षा जास्त किमतीच्या योजना संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करावयाचे होते. त्यानुसार सदर योजनांना डीडब्ल्यूएसएम ची मान्यता प्रदान करून अंदाजपत्रकासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास वर्ग करण्यात आले.
त्याअनुषंगाने मान्यता मिळालेल्या सदर योजना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी मा. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई यांच्याकडे अंतिम मंजुरी करीता पाठविले आहे.
अनेक वर्षांपासून मागणी असलेली पाण्याची समस्या आता नितिन भटारकर यांच्या प्रयत्नातून लवकर निकाली लागणार असल्याने ग्रामपंचायत दुर्गापूर व स्थानिक सर्वसामान्य नागरिकांनी नितीन भटारकर यांचे आभार मानले आहे.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793