भटाळी येथील अतिवृष्टीग्रस्त ६६ कुटुंबांना वेकोलिकडून धनादेशाचे वितरण..

0
53
वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने ब्लँकेटचेही वाटप.

सोमवार, दि. ०३ ऑक्टोबर.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील चंद्रपूर तालुक्यात येणार्‍या गटग्रामपंचायत पायली-भटाळी येथील अतिवृष्टीग्रस्त ६६ कुटूंबाना राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे वेकोलिकडून देण्यात येत असलेल्या प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण आज सायंकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
याचवेळी त्या अतिवृष्टीग्रस्त ६६ कुटूंबाना ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून उपलब्ध ब्लँकेटचेही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

लोकनेते ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात पायली-भटाळीच्या सर्वांगीण विकासासाठी, येथील जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. वेकोलिने सुद्धा या भागाच्या विकासासोबत पायली-भटाळीत सामाजिक कार्यक्रम आणि मुलभूत सुविधांसाठी नेहमी सहाय्य करण्याची भूमिका ठेवली पाहिजे अशी भावना जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी याप्रसंगी बोलताना  व्यक्त केली.
प्रसंगीच ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भ्रमणध्वनीहून पायली-भटाळी वासीयांशी संवाद साधत नवरात्री व विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला, भाजपा नेते रामपाल सिंह, उपक्षेत्रीय प्रबंधक महापात्रा, खान प्रबंधक शेठी, सरपंच राकेश गौरकर, माजी पं. स. सदस्य संजय यादव, सुभाषमामा गौरकर, तालुकाध्यक्ष हनुमान काकडे, महिला आघाडीच्या अनिताताई भोयर, शेलेंद्रसिंह बैस, हंसराज रायपुरे, उपसरपंच किसन उपरे, मोहन तुराणकर, संदिप रायपुरे, सौ. वैशालीताई सोनटक्के, सौ. मनिषा रत्नपारखी, प्रशांत कोपूला, बंडू सोनटक्के, विकास पेंद्राम, वामन देवतळे, सचिव हर्षवर्धन खोब्रागडे, सौ. शारदाताई मेसरे आदींसह मोठ्या संख्येने भटाळी-पायलीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here