HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर,(वि. प्र.) : केंद्र सरकारकडून आशा स्वयंसेविका आणि गट प्रवर्तकांचे मानधन ऑक्टोबर २०२५ पासून (मागील ८ महिन्यांपासून) थकल्याने या कर्मचाऱ्यांवर तीव्र आर्थिक संकट ओढवले आहे.
सरकारच्या या उदासीनतेच्या निषेधार्थ, थकीत मानधन त्वरित न मिळाल्यास देशव्यापी ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आयटकचे राज्य महासचिव श्याम काळे यांनी दिला आहे.
१८ मे २०२६ रोजी तुकूम, चंद्रपूर येथे आयोजित ‘महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक कर्मचारी संघटना’ (आयटक) च्या जिल्हा मेळाव्यात हा निर्धार करण्यात आला.
या मेळाव्याचे उद्घाटन कॉ. विनोद झोडगे पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी कॉ. ज्योती अंडरशहरे होत्या. आशा व गट प्रवर्तकांना
आम्ही आमची सेवाकुणासाठी।
मानधन रखडले,कुटुंब उघड्यावर !
शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. आठ महिन्यांचे थकीत मानधन आणि कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता त्वरित द्यावा.
अँड्रॉइड मोबाइल आणि डेटा पॅक दिल्याशिवाय अॅप’वरील ऑनलाइन कामाची सक्ती बंद करावी.
सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६५ वर्षे करावी किंवा दरमहा ५,००० रुपये निर्वाह भत्ता द्यावा इत्यादी मागण्या पुढे करण्यात मेळाव्यात आशा कर्मचाऱ्यांच्या १०वी व १२वीमधील गुणवंत पाल्यांचा ‘पुस्तक भेट’ देऊन सत्कारही करण्यात आला.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*