HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर(का.प्र.): चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन तर्फे आगामी सण बकरी ईद (ईद उल अज़हा) निमित्त शहर हद्दीतील सर्व मज्जित कमिटी पदाधिकारी मौलाना मुस्लिम प्रतिष्ठित शांतता समिती सदस्य यांची बैठक चंद्रपूर पोलिस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 23 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता घेण्यात आली.
या बैठकीत चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली,बाळू खोब्रागडे, ॲड. आशिष मुंधडा महावितरण चे सहायक अभियंता शैलेश आभारे व सहाय्यक अभियंता राज राहुलगडे, दारूल उलूम मोहम्मदिया चे अध्यक्ष मुश्ताक खान रिजवी, कारि अब्दुल वकील, मौलाना अनवर रज़ा, मौलाना रियासत हुसैन, मौलाना ज़फिर रज़ा, शकील रिज़वी, सादिक भाई, शेख महेबूब, फहीम रज़ा खान, मोहम्मद तसलीम,सुजात अली, मोहम्मद इश्तियाक, मोहम्मद अकील, अब्दुल रफीक, शेख मोबीन, सोहेल शेख जफर कुरेशी, शहर शांतता समिती सदस्य राजू राठोड, दर्शन बुरडकर, श्रीमती रेखा धनंजय दानव,ताजुद्दीन शेख, विशेष शाखा चंद्रपुरचे लक्ष्मण रामटेके सह अनेक मान्यवर या बैठकीला हजर होते.
आगामी ईद उल अज़हा (बकरी ईद) – 2026 या सणाच्या अनुषंगाने शासन प्रशासनाचे वतीने प्राप्त मार्गदर्शक सूचना तथा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा या दृष्टिकोनातून पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली यांनी याप्रसंगी अनेक सूचना करून आगामी सण बकरी ईद (ईद उल अज़हा) बाबत आवश्यक त्या परवानग्यासाठी आयोजकांकडून रीतसर अर्ज संबंधितांना देण्यात आल्याबाबतची माहिती दिली.
धार्मिक सलोखा व एकात्मतेची भावना जपत बकरी ईद साजरी करावी:निशिकांत रामटेके
चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी अवैध जनावरांची वाहतूक किंवा कत्तल करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपस्थितांना दिली.
स्वच्छता राखावी, शासनाकडून प्राप्त आदेशाचे पालन करावे .
धार्मिक सलोखा व एकात्मतेची भावना जपत बकरी ईद साजरी करावी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याबाबत दखल घ्यावी अशी विनंती देखील याप्रसंगी निशिकांत रामटेके यांनी केली व तुम्ही आम्ही सर्व मिळून हा सण उत्सव आनंदाने साजरा करू या असे आवाहनही या प्रसंगी रामटेके यांनी केले.
मज्जिद, ईदगांह पदाधिकारी मौलाना, मुस्लिम प्रतिष्ठित नागरिक गणमान्य व्यक्ती तथा शांतता समिती सदस्य अशा सर्वांनी या बैठकीत उपस्थित राहून आगामी सण शांततेत उत्साहात आनंदाने साजरा करण्यात येईल असे विश्वास या प्रसंगी व्यक्त केले.
























