HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर(का.प्र.): पुढील आठवड्यात संपूर्ण जिल्ह्यात बकरी ईद साजरी करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हाभर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन कटिबध्द आहे. प्रशासनाला सहकार्य करून नागरिकांनीसुध्दा सण आणि उत्सव आनंदात व शांततेत साजरे करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले.
नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्हा प्रशासन आणि पेालिस विभागाच्या वतीने आयेाजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, सहायक पोलिस अधिक्षक गौरव कायंदे पाटील यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीचे सदस्य, पोलिस पाटील सह अनेक विभागाचे अधिकारी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, शहरातील पाणी पुरवठा व वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. सोशल मिडीयावर फेक किंवा निगेटिव्ह मॅसेज दिसला की त्वरीत पोलिस विभाग किंवा सायबर टीमला कळवावे. वेळेवर फॅक्ट चेक करावे, जेणेकरून अफवा पसरणार नाही.
विशेष म्हणजे पुढील काही दिवस चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सकाळी सण साजरा झाल्यावर दुपारी कोणीही विनाकारण बाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
मनपा आयुक्त अकुनूरी नरेश म्हणाले, शहरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित रहावा, यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
कुर्बानीच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून दिले जाईल. साफसफाई व इतर आवश्यक उपाययेाजना मनपाने केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन पोलिस अंमलदार मंगला घागी यांनी केले.
पोलिस प्रशासन सजग: पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी.
ईद निमित्त संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गोमांसची तस्करी होऊ नये, यासाठी आंतरजिल्हा व आंतरराज्य सीमेवर नाकाबंदी पॉईंट्स सुरू करण्यात आले आहे.
सोशल मिडीयावरील अफवांवर किंवा चुकीच्या पोस्टवर लक्ष ठेवण्यासाठी सायबरची टीम 24X 7 कार्यरत आहे. काही चुकीचे आढळल्यास पोलिस विभाग किंवा 112 क्रमांकावर त्वरीत माहिती द्यावी.
जिल्ह्यात बकरी ईद शांततेत साजरी करण्यासाठी पोलिस प्रशासन सजग आहे, अशी ग्वाही जिल्हा पोलिस अधिक्षक आयुष नोपाणी यांनी दिली.
शांतता समिती सदस्यांनी केल्या सुचना:
ईद निमित्त शांतता समितीच्या सदस्यांनी यावेळी प्रशासनाला सुचना केल्या.
यात 1) विद्युत पुरवठा अखंडीत राहावा 2) पाणी पुरवठा नियमित व्हावा 3) कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी चोख बंदोबस्त ठेवावा 4) गर्दीवर योग्यरित्या नियंत्रण ठेवावे 5) असामाजिक तत्व व विघातक लोकांना गर्दीपासून दूर ठेवावे 6) सोशल मिडीयावर अफवा पसरू नये, यासाठी गांभियाने दक्षता घ्यावी 7) शहरातील पार्किंगचे योग्य व्यवस्थापन करावे 8) अवैध होर्डीग्जवर कारवाई करावी.
अश्या अनेक सूचना या बैठकीत चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली, सदानंद खत्री, छोटू भाई शेख जैरुद्दीन, प्रवीण उर्फ बाळू खोब्रागडे सह अनेक मान्यवरांनी केल्या.
या बैठकीला चंद्रपूरचे जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा, राजुराचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार, नगरपरिषद वरोराचे मुख्य अधिकारी सिद्धार्थ मेश्राम, बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विशाल वाघ, चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार पाटील, राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा, बल्लारपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे, घुग्गुस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत, भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी, गडचांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, कोरपना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक लता वाढीवे, मुल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड, सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लावार, सह जिल्ह्यातील अनेक पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक, प्रभारी, व चंद्रपूर जिल्हा शांतता समितीचे सदस्य सय्यद रमजान अली, सदानंद खत्री,बाळू खोब्रागडे, छोटू भाई जैरुद्दीन शेख, उमाकांत धोटे, नरेंद्र बोबडे, गुलाब पाटील, प्रकाश शेंडे, मोरेश्वर खैरे, इबादूल सिद्दिकी सह अनेक विभागाचे अधिकारी व चंद्रपूर जिल्ह्यातील पोलिस पाटील ही या बैठकीत मोठ्या संख्येने हजर होते.
या बैठकीनंनंतर चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली, सदानंद खत्री, छोटू भाई शेख जैरुद्दीन, गुलाब पाटील,बाळू खोब्रागडे,मोहसीन राजा पठाण,जावेद अन्सारी सह अनेक मान्यवरांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत व जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांचे शाल देऊन व छत्रपती शिवाजी महाराज यांचे फोटो भेट देऊन स्वागत-सत्कार केले.
























