*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793
बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष श्री. हरीश शर्मा यांच्या मातोश्री श्रीमती कुसुमदेवी शर्मा यांच्या निधनाने भाजपा परिवारातील ज्येष्ठ सदस्य व मातृतुल्य व्यक्तीमत्व हरपल्याची शोक भावना चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
श्रीमती कुसुमदेवी शर्मा यांनी पती श्री. जगदीशचंद्र शर्मा आणि मुलगा श्री. हरीश शर्मा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत बल्लारपूर शहरात भाजपाचे संघटनकार्य मजबुत करण्यावर कायम भर दिला. अतिशय शांत व मायाळु स्वभावाच्या श्रीमती कुसुमदेवी यांनी भाजपा महिला आघाडीच्या कामात सुध्दा सक्रीय योगदान दिले. त्यांच्या निधनाने भाजपा परिवाराची मोठी हानी झाली आहे. या दुःखातुन सावण्याचे बळ परमेश्वर त्यांच्या कुटूंबियांना देवो व त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्हटले आहे.