*२५ लाख गरिबांची दिवाळी साजरी होऊ द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र.*

0
31

*केंद्र सरकारने गरजु, निराधार, विधवा, अपंग व मरणोत्तर अर्थसहाय्य या योजनांचे एप्रिल महिन्यापासून थकीत केलेले अनुदान तात्काळ द्यावे :- नितिन भटारकर.*

चंद्रपूर :- देशातील गरजु नागरिकांना अर्थसाहाय्य मिळावे या हेतूने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने योजना सुरू केली होती. या सुरू करण्यात आलेल्या विविध योजनां अंतर्गत समाजातील गरीब, गरजू, विधवा, अपंग, निराधार तसेच वय वर्षे ५९ असताना कुटुंबप्रमुख मृत्युमुखी पावलेल्या परिवाराच्या सदस्यांना अर्थसहाय्य देणे संदर्भात निर्णय करण्यात आला होता.

या योजनेतील अनुदानाची काही रक्कम राज्य सरकार देत असून उर्वरित अनुदानाची रक्कम ही केंद्र सरकार द्वारे देण्यात येते. मात्र एप्रील २०२२ पासून आज पर्यंत केंद्र सरकार द्वारे या राज्यात असलेल्या शेतकरी, शेतमजूर, गरीब, गरजू, विधवा, अपंग, निराधार याकरिता असलेल्या पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकार द्वारे देण्यात येत असलेली अनुदानाची रक्कम पैसे नसल्याचे कारण पुढे करून केंद्र सरकार द्वारे अनुदान थकविण्यात आलेला आहे.

या गरजू व गरीब लाभार्थ्यांना तात्काळ अनुदानाची रक्कम देण्यात यावी या मागणी करिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात एकीकडे भव्य स्वरूपाचे संसद भवन असताना सेंट्रल विस्टा चे नावे बनवण्यात येणाऱ्या नवीन इमारतीसाठी १३ हजार ४५० कोटी रुपये केंद्र सरकार द्वारे खर्च करण्यात येत आहे. तसेच आदरणीय मोदी साहेब आपल्याकडे सुसज्ज व सुरक्षित विमान असतानाही ८ हजार ४०० कोटी रुपये खर्च करून नवीन विमान खरेदी करण्यात आला आहे. आपण जो मोन्टब्लॅक या कंपनीचा पेन वापरता त्या पेनीची किंमत तब्बल १ लाख ३० हजार रुपये आहे असे ऐकले आहे परंतु या देशातील, या राज्यातील गरीब, गरजू, अपंग, निराधार व विधवा यांना देण्याकरिता अनुदानाची रक्कम मात्र केंद्र सरकारकडे नाही, असे कारण पुढे करणे ही आपणा व आपल्या केन्द्र सरकार करिता शोकांतिका असल्याचे पत्रात नमूद केलेले आहे.

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृती वेतन योजने अंतर्गत केंद्र सरकार द्वारे प्रतिमाह ३०० रुपये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेअंतर्गत गरजू पात्र वृद्धांना प्रतिमा २०० रुपये, अपंग असलेल्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजने अंतर्गत प्रतिमाह ३०० रुपये अनुदान देण्यात येत असून राष्ट्रीय अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत वय वर्षे ५९ असलेल्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास केंद्र सरकारतर्फे एकमुस्‍त २० हजार रुपयांची आर्थिक मदत त्या गरीब व गरजू कुटुंबाला देण्यात येत होती, मात्र या सर्व योजने अंतर्गत येत असलेल्या अनुदानाच्या रकमा सुद्धा एप्रिल महिन्यापासून केंद्र सरकारने थकीत केलेल्या आहे.

या राज्यातील या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या तालुका निहाय नागरिकांची संख्या तब्बल २५,००,००० हून अधिक असून वरील योजनेकरिता पात्र असलेल्या गरीब गरजुंना प्रतिमाह मिळणाऱ्या २०० रुपये व ३०० रुपये ही रक्कम देखील त्यांच्यासाठी खूप मोठी मदतीची आहे.

एप्रिल महिन्यापासून मिळत नसलेल्या रकमेसाठी गाव खेड्यातील सदर हे गरीब, गरजू, निराधार, अपंग, विधवा लाभार्थी आपल्या अनुदानाची रक्कम मिळावी याकरिता वारंवार तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सरकारी कार्यालयात भेटी देत आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेले हे सर्व गरजू आता आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासात देखील भरकटले जात आहे.

जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फत पाठविलेल्या पत्रात भटारकर यांनी मागणी केली आहे की या सर्व गरजूंची थकविलेली एप्रिल पासून ची रक्कम तात्काळ देऊन या सर्व पात्र व गरजू लाभार्थ्यांची दिवाळी निदान आनंदाने जाऊ द्यावी.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here