यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांना अभिवादन

0
48

आज शुक्रवारी क्रांतीवीर शहिद बाबूराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या १६४ व्या शहिद दिनानिमित्त जिल्हा कारागृहातील शहिद स्मारक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रांतीवीर शहिद बाबूराव शेडमाके यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, सिध्दार्थ मेश्राम, संगीता येरमे, बंडु पेंदाम, सावन उईक, रवि मेश्राम, दिवाकर मेश्राम, सुनिल मेश्राम, साईनाथ मडावी, कार्तिक कोडापे, रमेश उईके, सविता दंडारे,  आशा देशमुख, विश्वजित शाहा, हेरमन जोसेफ, तापोष डे, देवा कुंटा, कल्पना शिंदे, किशोर बोलमवार, वैशाली मद्दीवार कल्पना शिंदे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाच्या इतर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शहिद विर बाबूराव शेडमाके यांची पुण्यतिथी शहिद दिन म्हणून मनवीली जाते. या वर्षीसुद्धा समाज बांधवांच्या वतीने शहीद दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  या निमीत्य जिल्हा कारागृह येथील त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाला होता. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करुन आदरांजली अर्पण करत अभिवादन करण्यात आले.

शहिद दिना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मसाला भात व पिण्याच्या पाण्याचे वाटप

शहिद दिनानिमित्त शहिद क्रांतिवीर बाबुरावजी शेडमाके यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी जिल्हा कारागृहाच्या परिरात जमलेल्या समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मसाला भात व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी असंख्य समाज बाधवांनी याचा लाभ घेतला.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here