स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर यांच्या तर्फे दिनांक 18 ऑक्टोबर, 2022 पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ज्युबली हायस्कुल , चंद्रपूर च्या पटांगणात संपन्न झाला.
अपयश ही यशाची पहीली पायरी आहे त्यामुळे सुरुवातीला खचून जावू नये व संघर्षातून प्रगती साधावी “ असे मार्गदर्शन श्री अमोल यावलीकर सहायक आयुक्त ,समाजकल्याण विभाग , चंद्रपूर यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात केले. श्री नफीज शेख जिल्हा व्यवस्थापक मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक मागास विकास महामंडळ यांनी विविध कर्ज योजनांची माहीती दिली. श्री शशिकांत मोकाशे यांनी विद्यार्थ्याना मोलाचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यानी द्विधा स्थितीत न राहता एकाग्र होउुन आपले ध्येय साध्य करावे . कार्यक्रमास श्री.भै.गो.येरमे सहायक आयुक्त् जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर , श्री नफीज शेख जिल्हा व्यवस्थापक मौलाना अब्दुल कलाम आझाद आर्थिक मागास विकास महामंडळ , श्री शाशिकांत मोकाशे मार्गदर्शक ,श्रीमती सुजाता वाघमारे प्राचार्य ज्युबली हायस्कुल , चंद्रपूर उपस्थित होते . कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्री भै.गो.येरमे , सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर.यांनी भुषविले.त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात , उमेदवारांनी आपल्या कौशल्यातून विकास साधून , रोजगार व स्वयंरोजगार प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले.
मेळाव्यामध्ये SBI लाईफ इन्शुरंस , रिलायन्स लाईफ इन्शुरंस , ॲलेक्स्टी मुच्युअल बेनिफिट निधी लिमी.चंद्रपूर, जिवन बीमा निगम , डॉमीनोज पिज्जा , आयडीएफसी फर्स्ट बॅक , नवकिसान बायो प्लॉट , विदर्भ वन क्लिक सोल्युशन , परम स्किल ,टॉलेन्ट स्टॉक , उषा कन्संल्टंसी , इनोवसोर्स इ . व कंपनीने सहभाग नोंदवीला.
सदर मेळाव्याला मोठया संख्येने उमेदवारांनी हजेरी लावली. त्यापैकी 253 उमेदवारांनी वेगवेगळया कंपनीकडे अर्ज सादर केले त्यापैकी 102 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली .अंतिम निवड करीता उद्योजक
उमेदवारांना संपर्क करणार असे त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शैलेश भगत कौविरोवउमाअधि चंद्रपूर यांनी केले . सुत्रसंचालन श्री अजय चंद्रपट्टन महात्मा गांधी नॅशनल फेलो यांनी केले . जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,चंद्रपूर च्या सर्व कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य करत कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793