सोमवार दिनांक:- 24 अक्टूबर 2022 रोजी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहर उपाध्यक्ष गणेश सिलगमवार यांनी शहरातील कंपोस्ट खत टाक्यांची पाहणी केली, त्यांना आढळून आले की कंपोस्ट टाकी केवळ कचरा गोळा करण्यासाठी बनली आहे, लाखो रुपये खर्च करून तैयार करण्यात आलेल्या या टाकीचा वापर खत बनवण्यासाठी केला जात होता, मात्र तो जनतेसाठी त्रासाचे कारण झाले, या टाक्यांमध्ये कचऱ्याचे ढीग असून, मेलेली जनावरे येथे टाकली जात आहेत, त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, या कंपोस्ट खताच्या टाक्या ज्या कामासाठी बनवल्या त्या कामासाठी वापरल्या गेल्या नाहीत तर लवकरच आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा सिलगमवार यांनी दिले आहेत.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793