आज दिनांक 24/10/2022 रोजी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार जी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संयोजिका अलका वेले यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेने बांधलेल्या लाखो रुपये किमतीच्या बायोगॅस प्लांटची पाहणी केली असता असे दिसून आले. या प्लांटचा लोकांना काहीच उपयोग नाही, त्यानंतरही नगरपरिषद महिन्याला ५२ हजार रुपये खर्च करत आहे, याचा फायदा काय? असा प्रश्न अलका वेले यांनी विचारला आहे, या प्लांटमध्ये निर्माण होणारी सर्व वीज फक्त तो प्लांट चालवण्यासाठी वापरली जाते, अशा प्रकारे जनतेच्या मुलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून खर्च केला जात आहे, जर अशाच प्रकारे जनतेचा पैसा वाया जात राहील, तर आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन करेल, असे संकेत अलका वेले यांनी दिले.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793