29 सप्टेंबर ला महिला स्वच्छता कर्मचारी यांच्या समर्थन मधे आणि बाजीराव नान्हे या कर्मचारी विरोधात स्वछता महिला कर्मचारी यांवर होणाऱ्या अत्याचारा विरुद्ध आम आदमी पार्टी ने कर्मचारी बाजीराव नान्हे याला तात्काळ निलंबन करण्याची मागणी केली. सदर महिला कर्मचारी यांनी संबंधित स्वछता देख रेख कर्मचारी विरुद्ध लिखित तक्रार मा. मुख्याधिकारी नगर परिषद यांना दिली त्या समवेत आम आदमी पार्टी ने सुद्धा सदर कर्मचारी ला ताड़का फड़की निलम्बित करण्याचे निवेदन दिले. सदर तक्रार याप्रमाणे होती की स्वछता देखरेख कर्मचारी हा महिलांना इतर नगरिकांसामोर अपशब्दात आणि शिवीगाळ करुन काम सांगायचा. काही विधवा महिलांना रोजी लावतो हे आमिष दाखवून शारीरिक सुखाची मागणी करायचा. या महिलांनी त्याला विरोध केला असता तुम्ही माझ काही पण बिघडवु शकत नाही अस तो ठाम पणे बजावुण सांगायचा माझ्या नौकरीला धक्का ही बसनार नाही पण जर तुम्ही तक्रार केली तर मी तुमची नौकरी जाईल या शब्दात तो महिलांना भीति दाखवून दबावात ठेवत होता. सदर स्वछता कर्मचारी महिला अशिक्षित आणि आर्थिक दुर्बल असल्यामुडे़ सदर कर्मचारी ची मागील 3 वर्षा पासुन गैरवर्तनुक आणि अत्याचार सहन केला परंतु यामुळे सदर कर्मचारी ची हिम्मत अजून वाढ ली आहे आणि त्याचा अत्याचार सदर महिलां वर पुन्हा वाढलेला आहे आणि तुम्ही माझ काहीच बिघडवु शकत नाही हे तो एकदम ठामपणे महिलांना बजावुण सांगतो. येवढ वाइट वर्तनुक करुण सुद्धा त्याचा मधे येवढा नौकरी न जान्यचा आत्मविश्वास यामुळे या कर्मचारी ला कोणाचा पाठबळ आहे अस शंशय त्या महिलांनमधे उपस्थित होत आहे. त्यामुळे सदर महिला अतिशय भीतीदायक वातावरणामध्ये काम करत आहे आणि त्याच्या अत्याचारामुळे त्रासलेल्या आहेत. सदर महिलांच्या मनात नौकरी सोडण्याचा निर्णय सुद्धा मनात आला आहे परंतु आर्थिक परिस्थिति अतिशय हालाकीची असल्यामुडे़ ते अन्याय सहन करत आहे आणि आपले काम नियमित करित आहे. ही अतिशय निंदनीय बाब आहे कोरोना काळा मधे असो किंवा स्वछता अभियान राबवण्यात असो या महिलांच खुप मोठे योगदान आहे. सदर स्वछता कर्मचारी महिला अशिक्षित, आर्थिक दुर्बल आणि कमजोर तबका असल्यामुडे़ त्यांच्यावर अन्याय होन हे अतिशय घृणास्पद आणि निंदनीय गोष्ट आहे. आम आदमी पार्टी ने या महिलां चा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही संपूर्ण ठामपणे महिलांच्या बाजूने उभे राहू असे आव्हाहन आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे देण्यात आल आहे. सदर निवेदन स्वीकारल्यावर उपस्थित स्वच्छता कर्मचारी महिलांचं तक्रार लक्षात घेऊन आणि पुराव्यांच्या आधारावर तात्काळ निलंबनाचे आदेश दिले आणि कर्मचारी बाजीराव नान्हे यावर चौकशीचे आदेश दिले. आम आदमी पार्टी सर्वसामान्या वर होनारा कोणताही अत्याचार सहन करणार नाही हे जाहिर अव्हाहन तालुका अध्यक्ष सोनाल पाटिल यांनी केले. सदर कर्मचारी च्या जागेवर कोणताही देखरेख कर्मचारी आला असता त्याने स्वछता महिला कर्मचारी यांच्या सन्मानाने वागणूक दिली पाहिजे मुख्याधिकारी नगर परिषद यांना बजावून सांगितले. सदर तक्रार नोंद करत असताना स्वछता कर्मचारी महिला तसेच तालुका सचिव सुमीत हस्तक, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम व आम आदमी पार्टी चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
संपादक :- शशी ठक्कर 9881277793























