. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या निर्देशानुसार सीसी टिव्‍ही कॅमेरे संदर्भात सायबर विभाग, पोलिस विभाग व महानगरपालिकेचे अधिकारी यांच्‍यासोबत चंद्रपूर भाजपा महानगर पदाधिका-यांची बैठक संपन्‍न.

0
71
चंद्रपूर महानगराच्‍या सुरक्षीततेच्‍या दृष्‍टीकोनातुन तसेच गुन्‍ह्यांवर नजर ठेवण्‍याच्‍या अनुषंगाने मनपा प्रशासनाने शहरातील काही मोक्‍याच्‍या चौकात सीसी टिव्‍ही कॅमेरे बसविले होते. मात्र यामधील काही कॅमेरे बंद असल्‍याचे समजताच भाजपा महानगर चंद्रपूर शाखेच्‍या वतीने पदाधिका-यांची तात्‍काळ बैठक घेवून कॅमे-यांबाबत आवश्‍यक ती उपाययोजना करण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातुन बैठक संपन्‍न झाली.

राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मस्‍त्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या निर्देशानुसार सायबर विभाग, पोलिस विभाग व महानगर पालिकेचे आयुक्त विपीन पालीवाल यांच्यासोबत चंद्रपूर महानगर भाजपाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी उपमहापौर राहूल पावडे, रामनगर ए. पी. आय. धोबे सर, पोलीस विभागाचे परतिके, भाजपा महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे, महानगर भाजपा महामंत्री सुभाष कासनगोट्टुवार, भाजपा महानगर उपाध्‍यक्ष सुरज पेदुलवार, भाजयुमो महामंत्री प्रज्‍वलंत कडू, सुशांत शर्मा, मनपा अभियंता विजय बोरीकर यांच्‍यासह यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्‍यात आले. या बैठकीत चंद्रपूर शहरातील सर्व  कॅमे-याचे सर्व्‍हे करून डीपीआर तयार करणे, सद्यःस्थितीत बंद असलेले कॅमेरे तात्‍काळ दुरूस्‍त करणे, हायवे रस्‍त्‍यावर दुर्घटनेमध्‍ये तुटलेले व खराब झालेले कॅमेरे बदलविणे, त्‍याचप्रमाणे चंद्रपूर महानगरपालिका व पोलिस विभागाच्‍या संयुक्‍त सहकार्याने शहरातील बंद स्थितीत असलेले कॅमेरे तात्‍काळ दुरूस्‍त करण्‍यात येतील. सद्यःस्थितीत असलेले कॅमेरे फार जुने झालेले आहे. त्‍यामुळे नविन प्रोजेक्‍ट तयार करून त्‍याठिकाणी नविन कॅमेरे बसविण्‍यात येतील. यासंबंधी पुन्‍हा बैठक घेवून चंद्रपूर शहरातील सर्व कॅमेरे सुस्थितीत करण्‍यात येतील असे या बैठकीदरम्‍यान ठरविण्‍यात आले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here