कार अपघातात डॉ. सुरेखा बरलोटा ठार,

0
47

शहर यवतमाल

दिवाळीच्या सुटीत दुबई येथे गेलेले डॉक्टर दाम्पत्याच्या कारला तेलंगणातील निर्मलजवळ भीषण अपघात झाला.

कार अपघातात डॉ. सुरेखा बरलोटा ठार, तिघे जखमी; हैदराबाद येथून परत येत असतानाची घटना

दिवाळीच्या सुटीत दुबई येथे गेलेले डॉक्टर दाम्पत्याच्या कारला तेलंगणातील निर्मलजवळ भीषण अपघात झाला. यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला तर चारजण जखमी आहेत. त्यांच्यावर निर्मल येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता दरम्यान घडली. अपघाताचे वृत्त कळताच यवतमाळातील वैद्यकीय क्षेत्राला जबर धक्का बसला.
डॉ. पीयूष बरलोटा, डॉ. संतोष बोडखे, डॉ. मिनल काळे असे तीन कुटुंब यवतमाळातून २५ ऑक्टोबरला दुबई जाण्यासाठी हैदराबाद येथे पोहोचले. दुबईवरून ते मंगळवारी हैदराबादला परत आले. तेथून यवतमाळकडे येत असताना निर्मल जिल्ह्यातील सोन या गावाजवळ डॉ. पीयूष बरलोटा यांची कार एमएच-२९-बीपी-४२०० ही अनियंत्रित झाली. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर ही कार धडकली. यात डॉ. सुरेखा बरलोटा यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमध्ये सोबत असलेल्या डॉ. मिनल काळे, अनिता बोडखे व इतर दोन मुले जखमी झाले. जखमींना तातडीने निर्मल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.

डॉ. पीयूष बरलोटा यांच्या पत्नी डॉ. सुरेखा, मुलगा पार्श व मुलगी पूजा आणि डॉ. संतोष बोडखे, त्यांची पत्नी अनिता व मुलगा, डॉ. मिनल काळे व त्यांचे कुटुंब असे तीन कुटुंब दुबई टूरसाठी गेले होते. हैदराबादवरून परत येत असताना हा अपघात झाला. अपघातग्रस्त कार पूर्णत: चकनाचूर झाली आहे.चौकट…
ताशी १२० चा वेग भोवलाअपघातग्रस्त कार ही ताशी १२० च्या वेगात धावत होती. त्यामुळे कार चालवित असताना डॉ. बरलोटा यांना कुठलाच अंदाज आला नाही. यामुळे रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर ही कार धडकली. ज्या बाजूने डॉ. सुरेखा बरलोटा बसून होत्या, तोच भाग झाडावर आदळला. बरलोटा यांना झाडाचा मार लागल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या. कारमधील इतर पाच जण किरकोळ जखमी झाले, अशी माहिती निर्मल (तेलंगणा) पोलिसांकडून देण्यात आली.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here