20 कोटी रुपयातुन होणार ग्रामिण भागातील रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

0
43

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिला 20 कोटी रुपयांचा निधी

आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी चंद्रपूर मतदारसंघातील ग्रामिण भागाच्या रस्त्यांसाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतुन ग्रामिण भागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. निधी मंजूर केल्याबदल आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभार मानले आहे.
चंद्रपूर मतदार संघातील विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न केल्या जात आहे. या भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी मोठा निधी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतुन शहरी व ग्रामीण भागात विकासकार्य सुरु आहे. दरम्याण ग्रामीण भागातील रस्ते तयार करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय राखीव निधीतुन 20 कोटी रुपये मंजुर करण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना केली होती. या मागणीची दखल ना. नितीन गडकरी यांनी घेतली असून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बांधकामासाठी 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून साखरवाही – येरुर – वांढरी एमआयडीसी – दाताळा या 10 की.मी. पर्यंतच्या मार्गाचे 10 कोटी रुपये खर्च करुन काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तर शेनगाव – उसेगाव – वढा – धानोरा – पिपरी – मारडा – शिवनी या 10 कि.मी. मार्गाचे 10 कोटी रुपये खर्च करुन काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या अगोदरही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ग्रामीण भागाच्या रस्त्यासाठी 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला  होता. मागणीची दखल घेत निधी उपलब्ध करुन दिल्या बद्दल आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here