असं कुणी करते का भाऊ…! बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याने टॉयलेटचा दरवाजाही सोबत नेला…

0
47

===========================

चंद्रपूर :- एका पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारन्यामाची भलतीच चर्चा चंद्रपुरात सुरू आहे. दोन वर्ष कर्तव्य बजावलेल स्थळ सोडताना या कर्मचाऱ्यांन इतर वस्तू सोबत टॉयलेटच्या दरवाजाही सोबत नेला.अनेक शासकीय कर्मचारी सहकाऱ्यांना, गावकऱ्यांना काहींना काही भेटवस्तू देऊन जातात.मात्र या अधिकाऱ्यान केलेली कामगिरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.विशेष म्हणजे आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर अनेक गुन्हेगारांना घाम सोडला होता.

“कभी इस डाल पर, कभी उस डाल पर” असं शासकीय कर्मचाऱ्यांच जीवन. आपल्या कर्तव्य काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीन काही अधिकारी कायमचे स्मरणात असतात.चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेतील एक नाव अस होत की जे नाव ऐकताच गुन्हेगारांना धडकी भरायची. अतिशय गुंतागुंतीचे असलेल्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा या अधिकाऱ्यान केला होता. चंद्रपुरात अडीच वर्ष स्थानिक गुन्हे शाखेत काढलं. आता त्यांची बदली मानव संसादन विभाग येथे झाली आहे. अडीच वर्षात या अधिकाऱ्यांन स्वतःचा सोयी सुविधांसाठी काही वस्तू खरेदी केल्या होत्या. बदली झाल्यानंतर या अधिकाऱ्यांन वस्तू सोबत नेल्याच, त्यासोबतच टॉयलेटला लावला दरवाजाही घेवून गेलेत. बहुतांश अधिकारी ज्या गावात कर्तव्य बजावतात त्या गावाला काहीतरी भेट वस्तू देऊन जातात. त्या गावाशी त्यांचे भावनिक ऋणानुबंध जोडले जातात. ज्यांनी आपल्यासाठी सहकार्य केलं, ज्या मातीत आपण काही वर्ष घालवलं त्या मातीला आपली ओळख असावी यासाठी काहीतरी मागे सोडून जातात. मात्र या अधिकाऱ्यान केलेली कामगिरी बघता सर्वांनीच तोंडावर बोट ठेवले आहे.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here