—————————————-
*भव्य महिला मेळाव्यात दिव्यांग व गरीब ,शेतकरी सर्व स्तरावर विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा -शालेय विद्यार्थ्यांचा सन्मान.*.
—————————————-
* कोरोनात मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना आर्थिक साह्य मदत *.
————————————–
* चाळीस वर्षापूर्वीच बचत गटाची संकल्पना उभी करणाऱ्या१०४ वर्षीय बहिणाबाई काळे,
गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांचा नागरी सत्कार.*
—————————————-
चंद्रपूर: जगात सर्वात जास्त सन्मान महिलांचा केला जातो .आई म्हणून केवळ जन्म न देता राष्ट्र घडविण्याचे काम आज स्त्री करताना दिसत आहे. महिला आज बचत गटाच्या माध्यमातून संघटित होऊन त्या कुकुटपालन ,शेती आणि अन्य व्यवसाय उद्योग करून कुटुंबाच्या आर्थिक समृद्धीस हातभार लावत आहे .शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आत्मनिर्भर व्हावे असे आव्हान आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले .
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सालोरी येन्सा मजरा लहान येथे भव्य महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .
त्या प्रसंगी उद्घाटन पर भाषणात त्या बोलत होत्या.
प्रसंगी महिला बचत गट मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक (शालेय साहित्य कपडे व स्कूल बॅग ) वाटप कार्यक्रम, दिव्यांग व्यक्तींना कपडे वाटप, महिला बचत गट ,अंगणवाडी सेविका व आशा वर्कर तसेच ४० वर्षांपूर्वी वर्षापूर्वी बचत गट संकल्पना नव्हती तेव्हा १०४वर्षीय बहिणाबाई काळे यांनी संकल्पना उभी करून बचत गट निर्माण केला होता. यावेळी ज्येष्ठ महिला बहिणाबाईचा सत्कार करण्यात आला. कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना आर्थिक मदत यावेळी देण्यात आली. सोबत गुरुदेव सेवा मंडळ मोझरी चे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सामाजिक, सांस्कृतिक ,कला- साहित्य काव्य या क्षेत्रात कामगिरी करित गोवा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या परमानंद तिराणिक, नीरज आत्राम यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती वरोरा माजी उपसभापती संजीवनी भोयर, संवर्ग विकास अधिकारी गोडशेलवार, अॅड. प्रिया पाटील, सामाजिक कार्यकर्ता सादिया खान, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख, जनमंच सदस्य रवींद्र तिराणिक, शशिकांत मोकाशे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सादिक थैम, एकनाथ चापले, वैभव साखरकर, अनिता पाटील, मजरा सरपंच वंदना निब्रड, उपसरपंच प्रमोद तोडासे, सरपंच जया चिंचोलकर, येन्सा उपसरपंच सुरेखा लभाने, निमसडा सरपंच चौधरी, उपसरपंच मजरा डंभारे, मुख्याध्यापिका शितल शर्मा,चिनोरा सरपंच जुम्नाके ,माजी सरपंच सुशीला तेलमोरे, आनंदवन सरपंच रुपवंती दरेकर, अनिता आत्राम, प्रतिभा मानकर, माधव जीवतोडे, ढोके, गांधी बोरकर, हर्षल निब्रड, गणेश काळे, महिला मेळाव्याचे संयोजक ग्यानीवंत गेडाम, सारिकाताई धाबेकर यांची उपस्थिती होती.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793