* आम आदमी पक्षातर्फे अपला हक आंदोलन *

0
48

======================

बुधवार दिनांक 22/02/2023 रोजी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नगर परिषद चौकात निषेध आंदोलन करण्यात आले, नगरपरिषदेची इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यासाठी नगरपरिषदेला दादाभाई नौरोजी वार्ड, पेपर मिल काटा गेट जवळील सुभाषचंद्र बोस विद्यालयात स्थलांतरित करण्यात आला आहे, त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, नगरपरिषदेच्या शाळांची अवस्था दयनीय आहे, शिक्षकांची कमतरता आहे. शासन शिक्षणाकडे दुर्लक्ष करून शिक्षणाचे बाजारीकरण करत आहे.विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलून दिले आहे ,आठवडी बाजाराची व्यवस्था न करता, नगरपरिषदेच्या नव्याने निर्माण झालेल्या कामाचा निर्णय म्हणजे जनतेची फसवणूक करण्यासारखे आहे, या निर्णयाला आम आदमी पार्टी बल्लारपुर चा विरोध, आधी शाळा व आठवडी बाजार कायमस्वरूपी करा, व्यवस्था करा, म्हणून आम आदमी पार्टी, बल्लारपूरच्या वतीने प्रशासनाच्या या अन्यायाला विरोध करत पक्षातर्फे तीन प्रमुख मागण्या घेऊन अपला हक्क आंदोलन करण्यात आले.

=====================÷÷=÷
विषय:- १) नगरपरिषदेच्या संपूर्ण शैक्षणिक सुविधा असलेल्या पाच शाळांची स्थापना.

=========================

२) नगरपरिषद सुभाषचंद्र बोस विद्यालयाच्या इमारतीतून पाच दिवसांत स्थलांतरित करावी.

=========÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
3) नगर परिषद तोडण्यापूर्वी आठवडी बाजाराची कायमस्वरूपी व्यवस्था करा.

===========================

या तीन प्रमुख मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करून साखडी उपोषण करण्यात येईल, असा इशारा शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांनी दिला.
या वेळी आम आदमी पार्टी बल्लारपुर चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष वं जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

============================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

==========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here