===≠====================
°| सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मुंबईत 19 मार्च रोजी एनसीपीए मध्ये होणार भव्य कार्यक्रम.
============÷÷÷=========
मुंबई, दि. 22 फेब्रुवारी 2023:
====================÷======
पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रवर्तित केलेल्या “एक भारत श्रेष्ठ भारत” या संकल्पनेअंतर्गत ज्येष्ठ अभिनेत्री व नृत्यांगना भाजपा खासदार श्रीमती हेमा मालिनी पावन गंगानदी वरील नृत्यनाट्याचे भव्य सादरीकरण मुंबईत करणार आहेत. राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत एनसीपीए नाट्यगृहात दि. 19 मार्च रोजी गंगा नदीवरील या भव्य नृत्यनाट्याचे आयोजन करण्यात येत आहे.
============≠===========
श्रीमती हेमा मालिनी यांनी नुकतीच मुंबईत राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेतली, तेव्हा या कार्यक्रमाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री विकास खारगे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
============================
राज्यात ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या “चला जाणूया नदीला” या जलसाक्षरता उपक्रमाविषयीची माहिती श्रीमती हेमा मालिनी यांना यावेळी दिली गेली. त्यावर प्रतिक्रिया देतांना त्या म्हणाल्या की, “गंगा नदीवरील आपले हे नृत्य नाट्य हे देखिल नदी साक्षरतेविषयी असल्याने या उपक्रमाचाही एक भाग समजता येईल.”
=======================
पंतप्रधान मोदीजींच्या “एक भारत श्रेष्ठ भारत” या संकल्पनेअंतर्गत देशातील विविधतेतील सांस्कृतिक एकात्मता आणि भारतीय संस्कृतीतील श्रेष्ठ मूल्ये यांचे महत्व समाजासमोर पुन्हा एकदा अधोरेखित केले जाणार आहे. देशभरात सर्वत्र अशा विविध कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे विविध पैलू उजळले जातील.
===================≠=======
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=============================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793