==============================
*महिलांच्या खेळाडुवृत्तीला मिळाली संधी*
=======================)
*आझाद गार्डन महिला संघ प्रथम तर लालपेठ महिला संघ द्वितीय*.
============================
चंद्रपूर :- राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहरातील स्वावलंबीनगर परिसरात माजी उपमहापौर राहूल पावडे यांच्या मुख्य आयोजनातुन योग-नृत्य परिवारातर्फे महिला क्रिकेट लीग सामन्यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
==========================
दिनांक १९ ते २७ फेब्रुवारीपर्यंत महिला क्रिकेट लीगचे यशस्वी आयोजन करण्यात आले. धकाधकीच्या आयुष्यात महिलांना आपल्यातील कलागुणांना, कौशल्याला, खेळाडूवृत्तीला व प्रतिभेला उजाळा मिळण्याकरिता संधी उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. याकरिता महिला क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन समारोपीय बक्षिस वितरण समारंभात भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले.
ही स्पर्धा बघण्याकरिता वार्डातील व इतर वॉर्डातील महिला प्रेक्षक मोठ्या प्रमाणात अतिशय उत्साहात उपस्थिती दर्शविली. अशी स्पर्धा चंद्रपूर शहरांमध्ये स्वावलंबी नगर येथे प्रथमच झाल्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या संधीमुळे महिला खेळाडुंना एक मोठे व्यासपीठ प्राप्त झाल्याचे मत माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी व्यक्त केले. व यापुढेही अश्याप्रकारचे आयोजन करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे सांगितले.
या स्पर्धेमध्ये एकूण 12 संघ सहभागी झाले होते. दुपारच्या सत्रामध्ये सामने खेळविण्यात आले. सोमवारी झालेल्या उपांत्य फेरीत आझाद गार्डन महिला संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर लालपेठ महिला संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. पारितोषीक वितरण भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे योग नृत्यचे जनक गोपाल मुंदडा अशोक हसानी गिरीश चांडक पियुष आंबटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी प्रामुख्याने माजी नगरसेविका सविता कांबळे, वंदना तिखे, बंटी चौधरी महेश बोडके अजय रणदिवे डवरे संजय बुरघाटे प्रमोद पुण्यपवार अभय बनपूरकर चांद सय्यद सचिन कोतपल्लीवार आदी उपस्थित होते. विजेत्या संघाला रोख रक्कम, स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता राहूल पावडे मित्र परिवाराने अथक परिश्रम घेतले.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793