Home
Home गडचिरोली *_मा. खा.अशोकजी नेते यांच्या निवासस्थानी आदिवासी विकास मंत्र्यांचे स्वागत_*

*_मा. खा.अशोकजी नेते यांच्या निवासस्थानी आदिवासी विकास मंत्र्यांचे स्वागत_*

0
113

=============================

गडचिरोली, 
*गडचिरोली* (का,प्र,)महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. डॉ. अशोकजी उईके यांनी आज गडचिरोलीतील माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.यावेळी माजी खासदार अशोकजी नेते यांनी मंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सौ. अर्चनाताई अशोक नेते यांनी पारंपरिक औक्षण करून आदरयुक्त सत्कार केला.याप्रसंगी मंत्री महोदयांनी गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांचा उल्लेख करत विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच माजी खासदार अशोक नेते यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले.यावेळी प्रामुख्याने जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, आमदार डॉ. मिलिंद जी नरोटे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, महिला आघाडी च्या प्रदेश सचिव रेखाताई डोळस,सहकार आघाडीचे प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष आशिष भाऊ पिपरे,तालुकाध्यक्ष विलास पा.भांडेकर यांच्यासह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहुन मंत्री महोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.   ===============================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==============================             

*हॅलो चांदा न्यूज,*
*मुख्य संपादक,*
*शशी ठक्कर,*
*9881277793,*
*कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे,*   *उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here