Home
Home चंद्रपूर *माहिती संचालक डा गणेश मुले यांची पत्रकारां सोबत चर्चा*

*माहिती संचालक डा गणेश मुले यांची पत्रकारां सोबत चर्चा*

0
67

=============================

*लघु वृत्तपत्रांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे आश्वासन।*  ============================
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपुर विभागीय संचालनालयाचे विभागीय संचालक डा गणेश मुले यांनी पदभार ग्रहण केल्यानंतर प्रथमच चंद्रपुर ला भेट दिली। जिला माहिती कार्यालयात त्यांनी चंद्रपुर येथील पत्रकारांसोबत चर्चा करुन महाराष्ट्र शासनाच्या विकास योजनांची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याचे आवाहन केले । या प्रसंगी चंद्रपुर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष वैभव पलीकुंडावार , सरचिटणीस सुनील तिवारी, मराठी पत्रकार परिषद मुंबई चे केंद्रीय प्रतिनिधि मुरलीमनोहर व्यास , रविंद्र नागापूरे माजी कार्याध्यक्षा सौ कल्पनाताई पलीकुंडवार यांनी पुष्पागुच्छ देऊन संचालक श्री गणेश मुले यांचे स्वागत केले । या प्रसंगी विविध पत्रकार संघांचे पदाधिकारी उपस्थित होते।
चर्चा करत असतांना जिल्हा मराठी पत्रकार संघाने संचालक महोदयांच्या लक्षात आणुन दिले कि, महाराष्ट्र शासन राज्यात करत असलेल्या विविध विकास कामांची माहिती जिल्हा वृतपत्रे साप्ताहिक वृत्तपत्रेच प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध करतात परंतु जाहिराती देतांना शासनाद्वारे लहान मोठ्या वृत्तपत्रांमधे भेदभाव करण्यात येतो। भविष्यात भेदभाव होणार नाही याकड़े लक्ष देण्यात यावे। विधान सभा निवडणुकी पूर्वी महाराष्ट्र शासनाने विशेष जाहिरात अभियानाअंतर्गत दहा जाहिराती मोठ्या वृत्तपत्रांना दिल्या , परंतु साप्ताहिक वृत्तपत्रांना फक्त एकच जाहिरात दिली । भविष्यात शासनाच्या विविध जाहिराती देतांना आश्या प्रकारे भेदभाव होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी।
महाराष्ट्र शासनाच्या जाहिरात धोरणानुसार शासनाच्या विविध विभागांद्वारे जाहिराती दिल्या जातात । शासनाच्या जाहिरात धोरणानुसार देयकांची अदायगी तीन महिन्यात करण्यात येईल , परंतु कांही विभाग दोन दोन वर्षे देयके देत नाही। याची दखल घेऊन सर्व विभागांना यथा समयी देयके देण्याचे निर्देश देण्यात यावे। संचालक महोदयांनी सर्व विभागांना पत्र देण्याचे मान्य केले।      ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==============================             

*हॅलो चांदा न्यूज,*
*मुख्य संपादक,*
*शशी ठक्कर,*
*9881277793,*
*कार्यकारी संपादक, शशिकांत मोकाशे,*  *उपसंपादक,विनोद शर्मा,9422168969*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here