======================
आज दिनांक 4 मार्च 2023 रोजी गट ग्रामपंचायत बेलोरा टाकळी कार्यालय येथे विशेष आम सभा घेण्यात आली. त्यामध्ये आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरज भाऊ शाहा उपाध्यक्ष सुमित भाऊ हस्तक व संपूर्ण गावकऱ्यांची मागणी होती की अरबिंदो इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात यावा. गावकऱ्यांना विश्वासात न घेता सरपंच व उपसरपंच यांनी मिळून बोगस ना हरकत प्रमाणपत्र तयार करून कंपनीला देण्यात आले. ही बातमी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुरज भाऊ शाहा व उपाध्यक्ष सुमित हस्तक यांना माहित पडताच आजच्या आमसभेत एकच मागणी ठेवली की ना हरकत प्रमाणपत्र लवकरात लवकर रद्द करण्यात यावा. आजच्या विशेष ग्रामपंचायत च्या मीटिंगमध्ये यावर चर्चा करून गावकऱ्यांच्या सहमतीने ठराव पारित करून सरपंच व बाकी सदस्यांच्या सहमतीने ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला व यानंतर ग्रामपंचायत कार्यालय मध्ये जे काही ठराव पारित होणार ते संपूर्ण गावकऱ्यांची उपस्थितीमध्येच निर्णय घेण्यात येणार असा आश्वासन यावेळी ग्रामपंचायतीचे सचिव साहेब यांनी दिले. या वेळी संपूर्ण गावकऱ्यांनी आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरज भाऊ व उपाध्यक्ष सुमित हस्तक यांचा आभार व्यक्त केला व शहराध्यक्ष सुरज भाऊ शहा व उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी सुद्धा गावकऱ्यांनी सहयोग केल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरज भाऊ शहा, शहर उपाध्यक्ष सुमीत हस्तक, तालुका अध्यक्ष सोनाल पाटिल, शहर उपाध्यक्ष आशिष भाऊ तांडेकर, शहर सचिव विजय सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिलकुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज शेख, शहर सहसचीव सचिन पाटील, महिला शहराध्यक्ष प्रतिभा कडूकर, शहर महिला कोषाध्यक्ष रेखा गेडाम, डोलारा प्रभाग प्रमुख केशवभाऊ पचारे, युवा शहर सचिव अतुल रोडगे, मंगेश खंडाळे, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, प्रफुल्ल शेलार, श्याम पिंपळकर, नितीन भाऊ देवगड़े, रितेश नगराळे, राजेश नरवडे, बाळू बांदुरकर, प्रदीप लोखंडे, चेतन खोब्रागडे, संजय भाऊ सातपुते, डोरी स्वामी, व्यापारी आघाडी प्रमुख घनश्याम भाऊ गेडाम, राजू भाऊ कोड़ापे, शुभम रामटेके, शुभम भोस्कर, विकी मुळेवार, दिलीप कापकर, सुभाष कोडापे, सचिन मुरसकर, अनिल कोकुडे, गौरव चांदेकर, बाळकृष्ण पिंपळकर, आनंद पुसाटे व संपूर्ण गावकरी उपस्थित होते
========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793