* नाले सफाई करणा-र्या कामगारांना कामावरुन कमी करु नका – आ. किशोर जोरगेवार *

0
47

====≠==============

 *अधिवेशनात केली मागणी *     

=========================

 चंद्रपूर महानगर पालिकेअंतर्गत नाले सफाईचे कंत्राट मिळालेल्या कंत्राटदार मार्फत 50 टक्के कामगारांची कपात केल्या जणार आहे. त्यामुळे जवळपास 106 अस्थायी कामगार बेरोजगार होणार आहे. ही बाब गंभीर असुन नाले सफाई करत शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असलेल्या एकाही कामगाराला कामावरुन कमी करण्यात येऊ नये अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलतांना केली आहे.

=======================

मनपा क्षेत्रातील नाले सफाई नियमीत करण्यासाठी 206 अस्थायी कामगार काम करत आहे. मात्र आता जुन्या कंत्राटदाराचा कंत्राट संपल्याने नवा कंत्राट मिळालेल्या कंत्राटदाराने कामगारांच्या संख्येत 50 टक्याने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. असे झाल्यास 106 कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे.

==========================

हा मुद्दा आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करत कामगारांच्या व्यस्थेकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे. यावेळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, गेले अनेक वर्ष 206 कामगार नाले सफाईचे काम करत आहे. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेचे नाले सफाईचे कंत्राट आता नविन ठेकेदाराला मिळाले असुन केवळ 100 कामगारांना कामावर घेऊन काम करण्याचा या नव्या ठेकेदाराचा मानस आहे. चंद्रपूर महानगर पालिका मोठी आहे. येथे योग्य सफाई होत नाही. अशी नागरिकांची नेहमी ओरड असतांना 206 कामगारांच्या येवजी 100 कामगारांच्या माध्यमातुन सफाईचे काम करणे शक्य नाही. नव्या कंत्राटदाराच्या म्हणण्या नुसार कामगारांएैवजी मशनरीच्या माध्यमातुन नाले सफाई केल्या जाणार आहे. मात्र सदर कंत्राटदाराकडे अशी कोणतीही मशीन उपलब्ध नाही. अशातही मशनरीने केवळ मोठे नाले साफ करणे शक्य आहे. गल्लीबोळातील नाल्या साफ करण्यासाठी मन्युष्यबळाची गरज लागणार आहे. याचा कोणताही अभ्यास न करता कामगारांच्या संख्येत 50 टक्याने कपात करण्याचा घेण्यात आलेला निर्णय स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य नाहीच सोबतच अनेक वर्षापासून चंद्रपूर स्वच्छ ठेवण्याचे काम करत असलेल्या कामगारांच्या हिताचा हि  नाही. त्यामुळे कामगारांच्या संख्येत कपात न करता 206 कामगारांना कामावर घेण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी बोलतांना सभागृहात केली आहे.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   

====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here