====================
* १ व २ एप्रिल रोजी पहिले राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलन चंद्रपुरात *.
========÷÷÷÷========
चंद्रपूर, :
==============
न्यूज़ एडिटिंग निलेश ठाकरे
=======================
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून लोकजागृती नाट्यकला सांस्कृतिक, सा. शैक्षणिक संस्था चंद्रपूरच्या वतीने १ व २ एप्रिल रोजी पहिले
राष्ट्रीय जयभीम संमेलन येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे.
या साहित्य संमेलनात देशभरातील साहित्यिक, वैचारीक, लोककलावंत, जलसाकार, नाटककार, वक्ते, मंत्री, खासदार, आमदार, चळवळीतील कार्यकर्ते, नेते, कवी तसेच आयएएस.
अधिकारी उपस्थित राहणार आहेत. जयभीम जलसा, जयभीम परिसंवाद, जयभीम कथाकथन, नाटक, कवीसंमेलन, एकपात्री नाटक, प्रसिद्ध गायकांची गाणी, सत्कार समारंभ व इतर
वैचारिक कार्यक्रम होणार आहेत. या साहित्य संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून विविध समित्या गठीत करण्यात येत असल्याचे लोकजागृती संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्य आयोजक
अनिरुद्ध वनकर यांनी सांगितले.
मानवाने चंद्रावर ठेवलेले पहिले पाऊल हे एका माणसाचे, देशाचे नव्हते तर ते संपूर्ण मानवी समाजाचे होते. तथागत बुद्धाचे तत्त्वज्ञान एका धर्माचे किंवा देशाचे नाही तर संपूर्ण मानव
समाजाच्या कल्याणासाठी आहे. त्या तथागताची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन चंद्रपुरातील जयभीम साहित्य संमेलन नक्कीच प्रेरणादायी असेल. दलित, आदिवासी,
भटके, ओबीसी, कष्टकऱ्यांचे हे साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने येथील मूळ मालकांचे साहित्य संमेलन असून, त्याचा उद्देश समता प्रस्थापित करणे हा आहे, असे मत अनिरुद्ध वनकर
यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केले.
==============
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*.
====================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793