=====================
* बिनबा गेट परिसरातील घटना *
=======================
* चंद्रपूर *
========================
येथील बिनबा गेट परिसरात नव्यानेच लावलेल्या बिनबा चौक लहुजी साळवे या फलकाचे अनावरण नुसतेच करण्यात आले. बिनबा गेट हा भाग अतिशय मागासलेला असल्याने या भागामध्ये नव्यानेच निर्मित केलेल्या लहुजी साळवे फलक अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. दरम्यान ही घटना 21 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.
या भागातील लहुजी सेनेकडून अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. सकाळी ही घटना उघडकीस येताच येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वाद चिघळू नये म्हणून पोलीस प्रशासनाने घटनास्थळी दाखल होत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. व परिसरात माहिती जाणून घेऊन चोरट्यांविरोधात कारवाई करू अशी आश्वासन देत लहुजी सेनेचे कार्यकर्त्यांना आश्वासन दिले आहे. पुढील तपास सुरू आहे.
=========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*.
============================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793