*वाढत्या विजेच्या दरा संदर्भात आम आदमी पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन*

0
36

=====================  

 * भद्रावती *. 

=========÷=========≠

सोमवार दिनांक 27 मार्चला राज्यामध्ये ठिकठिकाणी जिल्हा, विधानसभा, तालुका, शहर पातळीवर वाढत्या वीज बिलाच्या विरोधात आम आदमी पार्टीचे भव्य आंदोलन होनार आहे. दिवसेंदिवस होत असलेल्या अदानी समूहाच्या शासकीय मालमत्तेत हस्तक्षेपामुळे आणि होत असलेल्या निजीकरणामुळे विविध क्षेत्रांमध्ये महागाई वाढलेली दिसत आहे. ज्यामध्ये भारत सरकारने विज निर्मितीसाठी अदानी समूहाकडून कोळसा आयात करणे सुरू केले तेव्हापासून वीज बिलामध्ये वाढ झाली. म्हणून ज्या क्षेत्रामध्ये मोदी सरकार अदानी समूहाला मालकी हक्क देत आहे त्या ठिकाणी नागरिकांना जास्तीत, जास्त पैसे मोजावे लागत आहे. हे विज बिल वाढण्याचे प्रकरण आम आदमी पार्टीचे मा. सांसद संजय सिंग यांनी भारतीय नागरिकांची फसवणूक होत आहे असे दिसताच संसदेमध्ये सर्वांच्या उघडकीस आणले. दिल्लीच्या आणि पंजाबच्या धर्तीवर सर्व राहणाऱ्या नागरिकांना 300 युनिट वीज बिल मोफत मिळू शकते तर महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये का बर नाही ? महाराष्ट्र मध्ये तर मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होते मग येथील जनतेला 300 युनिट मोफत मध्ये वीज का बर नाही ? हा प्रश्न आम आदमी पार्टी महाराष्ट्र शासनाला तसेच केंद्र सरकारला विचारना करत आहे . त्यामुळे बिलामध्ये होत असलेला भारतीय नागरिकांच्या फसवणुकीच्या विरोधात आम आदमी पार्टीचे राज्यव्यापी तीव्र आंदोलन होत आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने आपल्या हक्क, अधिकारासाठी सहभागी होण्याचे आव्हान आम आदमी पार्टी तालुका भद्रावती संयोजक सोनाल पाटील तसेच भद्रावती शहर संयोजक सुरज शहा तर्फे सर्वसामान्य जनतेला करण्यात येत आहे.

=====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===÷÷÷============

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here