=====================
जंगलात सरपण गोळा करण्यासाठी अष्टभुजा वार्डातील रहिवासी 50 वर्षीय भजन अंनत पारई यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झाला. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी पारई कुटुंबीयांची भेट घेत त्यांना आर्थिक मदत केली आहे. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक विश्वजीत शाहा, युवा नेते अमोल शेंडे यांची उपस्थिती होती.
=================
अष्टभुजा वार्डातील भजन पारई हे मोलमजुरी करुन आपल्या परिवाराचा सांभाळ करत होते. घटनेच्या दिवशी काम नसल्याने सरपण गोळा करण्यासाठी ते एमईएल लगतच्या जंगलात गेले होते. ते बराचा वेळ घरी परत न आल्याने जंगलात त्यांचा शोध घेतला असता त्यांच्या शरिराचे काही अवयव आढळून आले. वन विभागाचे या प्रकरणाची चौकशी केली असता वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले.
====================
दरम्यान मुंबई अधिवेशन संपल्या नंतर चंद्रपूरात येताच आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतक भजन यांच्या अष्टभुजा वार्डात स्थित घरी जात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी परिवाराला आर्थिक मदत केली. अशा दुखाच्या प्रसंगात लोकप्रतिनीधी म्हणून मी आपल्या सोबत असल्याचे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी त्यांनी यावेळी मृतकाच्या परिवाराला शासनातर्फे मिळणारी आर्थिक मदत लवकर मिळावी यासाठी शासकीय प्रक्रिया जलद गतीने पुर्ण करण्याच्या सूचना यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
==========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*.
============================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793