* चिराण सागवानाची पहिली खेप अयोध्येसाठी रवाना होण्यास तयार *

0
45

================≠=

* बुधवारी ना.मुनगंटीवार यांचे हस्ते विधिवत पूजन *
========================
अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले जात आहे.मंदिरातील महाद्वारसाठी चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील सागवान काष्ठाची निवड तज्ञ मंडळींनी केली होती.त्या अनुषंगाने चिराण सागवान लाकडांची विविध आकारात तयार केलेली 1855 घन फूटची पहिली खेप बल्लारपूर येथील वन विकास महामंडळाच्या आगारात सोमवार 27 मार्चला पोहचली अशी माहिती वन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार यांनी बोलतांना दिली आहे.
अयोध्या येथील श्री राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड आणि मे. लार्सन अँड ट्युब्रो लि. या कंपनीमध्ये सुमारे 1855 घन फूट चिराण सागवान लाकडाचा पुरवठा करण्यासाठी रूपये 1, 31, 31,850/- चा दिनांक 15 डिसेंबर 2022 रोजी विक्री करार करण्यात आलेला होता. श्री राम मंदिर उभारणीचे काम जसजसे पुढे जाईल तसतसे FDCM कडून अधिक सागवान लाकूड पुरवठा केला जाणार आहे.त्यानुसार फारेस्ट डेव्हलपमेंट  कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेड यांच्या अखत्यारीत असलेल्या शासकीय आरागिरणी, आलापल्ली व बल्लारशाह येथे मागणीनुसार चिराण सागवान माल तयार करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच दिनांक 19 जानेवारी 2023रोजी अयोध्या राममंदीर ट्रस्टचे प्रतिनिधी तसेच वास्तुविशारद चमू यांनी शासकीय आरागिरणी, आलापल्ली येथे भेट देऊन पुरवठा करण्याकरीता चिराण सागवान लाकडाचा आकार आणि गुणवत्ता निश्चित केली होती.हे विशेष.
=====================

 ,* बल्लारशाह सागाचे वैशिष्ट्य *. 

======================

बल्लारशाह सागवान लाकडात तेलाचे प्रमाण जास्त असल्याने उच्च शक्ती, जास्त टिकाऊपणा आणि कीटक आणि वाळवी प्रतिकारक. फिनिशिंगनंतर तेलाचे प्रमाण जास्त असल्याने लाकडाची शायनिंग अतिशय सुंदर आणि आकर्षक असते.

=========================

* वनमंत्र्यांचा पुढाकार आणि संकल्पना *  

=============================

सुधीर मुनगंटीवार, अध्यक्ष एफडीसीएम आणि वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री, महाराष्ट्र सरकार यांनी पुढाकार घेऊन एफडिसीएम मध्ये एक आध्यात्मिक संकल्पना मांडली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली,एफडसीएम हे श्री राम जन्मभूमी मंदिराच्या बांधकामासाठी उत्कृष्ट दर्जाच्या सागवान लाकडाचा पुरवठा करत आहे.असेही सुमित कुमार म्हणाले.29 मार्चला विधिवत पूजन करून हे काष्ठ शोभायात्रेच्या माध्यमातून अयोध्या रवाना होणार आहे.

============================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here