========================
*सचिन बोबडे*
=======================
चंद्रपूर :- चंद्रपूर येथील बिनबा वार्ड येथे लहुजी सेनेच्या वतीने रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी चंद्रपूर लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विधीवत पूजन करण्यात आले.
मर्यादा पुरुषोत्त श्रीराम यांचा आदर्श समोर ठेवून सर्वांनी सद्काार्याला वाहून घेत समाजात कार्य केले पाहिजे. सर्वांप्रती सद्भाेवना व प्रेम ठेवून समाजात आदर्श नागरिक म्हणून देव, देश व समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन यावेळी राजेश आमटे यांनी केले.यावेळी जय श्रीराम.. जय जय श्रीरामाच्या जयघोषानांनी परिसर. निनादून गेला होता. यावेळी वॉर्डातील नागरिक व लहुजी सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने राम जन्म महोत्सव या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793