========================
*आम आदमी पार्टी समर्थित झोपडपट्टी विकास संघटनेचे अध्यक्ष राहुल सोनटक्के यांच्या उपोषणाला यश. प्रथम रेल्वे गाडी दक्षिण 01 एप्रेल 2023 ला भांदक रेल्वे स्थानकावर थांबणार.*
=================÷===÷÷
झोपडपट्टी विकास संघटनेचे अध्यक्ष राहुल भाऊ सोनटक्के यांनी रेल्वे स्थानकावरील 14 रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा याबाबत उपोषण सुरू केले होते. उपोषण सुरू करण्याआधी राहुल भाऊ सोनटक्के यांच्या झोपडपट्टी विकास संघटनेने तसेच आम आदमी पार्टीने आणि विविध संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे जाऊन या विषयावर विविध निवेदने तसेच पत्रव्यवहार केला होता. तरी रेल्वे प्रशासनाला याची जाणीव झाली नाही. त्यामुळे राहुल सोनटक्के यांनी या विषयाच गांभीर्य ओळखून तसेच भद्रावतीकरांची प्रायव्हेट बसद्वारे होणारी आर्थिक लूट बघून दि. 03 जानेवारी 2023 ला तात्काळ. उपोषणाला बसण्याचे ठरवले. त्यामध्ये सर्व प्रथम आम आदमी पार्टीने राहुल सोनटक्के यांना जाहीर समर्थन दिले. आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सतत राहुल भाऊ सोनटक्के यांच्या संपर्कात राहून त्यांना धीर देत राहिले. राहुल भाऊ सोनटक्के यांचे उपोषण सतत चार दिवस राहिले. राहुल भाऊ यांनी हे उपोषण एक थेंब पाणी न पिता पूर्ण केले. अखेर भद्रावती करांमध्ये याबाबत माहिती होऊ लागली आणि जनतेचा रोष वाढू लागला, शासन जागे झाले आणि उपोषण सोडण्यासाठी मा. माजी खासदार हंसराज भैय्या अहिर यांनी राहुल भाऊ सोनटक्के यांना आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास सांगितले. त्यानंतर झोपडपट्टी विकास संघटनेचे राहुल भाऊ सोनटक्के, व्यापारी संघटन, ऑटो असोसिएशन, आम आदमी पार्टी यांनी सतत या आश्वासनाचा पाठपुरावा करत राहिले. या पाठपुराव्याचं यश म्हणून दिनांक 01 एप्रिल 2023 ला भांदक रेल्वे स्थानकाला दक्षिण या प्रथम रेल्वेगाडी चा थांबा मिळणार आहे. तरी या भद्रावती करांच्या. गांभीर्यपूर्वक समस्या कडे राहुल भाऊ सोनटक्के यांनी उपोषणाद्वारे शासन प्रशासनाचे लक्ष वेधले समस्या सोडवण्यामध्ये यश मिळाल्याबद्दल आम आदमी पार्टी तालुका भद्रावती, भद्रावती शहर कार्यकारिणी हार्दिक अभिनंदन करते. झोपडपट्टी विकास संघटनेचे राहुल भाऊ सोनटक्के यांच्या उपोषणाला आम आदमी पार्टी, व्यापारी संघटन भद्रावती, युवा परिवर्तन ऑटो असोसिएशन, शेतकरी आघाडी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया व इतर पक्षांनी समर्थन दिले होते.
==========÷÷÷÷÷÷÷÷=÷÷
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
======================
*बातमी व जाहिरात करीता संपर्क साधा*
======÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
संपादक :- शशी ठक्कर 9881277793