* बाल संरक्षण कक्षाच्या कौशल्याने दोन बाल विवाहास प्रतिबंध घालण्यात यश *

0
39

***********************

जिल्हा महीला बाल विकास विभागाच्या अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षा तर्फे दि. २८/०४/२०२३ रोजी जिवती तालुक्यातील एका गावात बालकांच्या व महिलांच्या सेवेत तत्पर असलेल्या स्वयं सेवी संस्थेच्या विश्वस्त सुत्रांकडून अल्पवयीन मुलीच्या लग्नाची सुचना गोपणीय पद्धतीने प्राप्त होताच मा. जिल्हाधिकारी मा. श्री. विनय गौडा जी. सी. व जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री. दिपक बानाईत यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्हा बाल संरक्षण कक्ष, स्वं: यसेवी संस्था प्रतिनिधी, चंद्रपूर चाईल्ड लाईन यांच्या चमूने जिवती तालूका गाठला विवाहासाठी तयार केलेल्या मुलींचे वय अनुक्रमे १४ व १६ वर्ष होते. या दोनही लग्नाच्या पत्रिकेनुसार दि. २९ व ३० ला विवाह संपन्न होणार होता. बाल संरक्षण विभागाकडून पोलिस स्टेशन जिवती यांना दिलेल्या सुचनेनुसार पो. स्टे. जिवती यांनी प्रथम बालविवाह थांबविण्याबाबात मुलीच्या पालकांना सुचना केल्या होत्या परंतु दि. २८/०४/२०२३ रोजी त्याच गावात चौकशी अंती दुसरा बालविवाह होत असल्याचे निर्दशनास आले त्यावेळी दोनही लग्नाचे पाहूणे आई वडील पालक गावकरी मंडळी गावातील युवक युवतींना एकत्रित बोलावून गावात बालविवाह प्रतिबंध कायद्याची सभा घेण्यात आली. त्या प्रसंगी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी श्री अजय साखरकर, स्वंयसेवी संस्था अध्यक्ष श्री. शशिकांत मोकाशे, बाल विकास प्रकल्प अधिकारी जिवती श्री गणेश जाधव, चंद्रपूर चाईल्ड लाईनचे टिम मेंबर श्री. अंकुश उराडे, प्रणाली इंदुरकर, प्रदीप वैरागडे प्रामुख्याने उपस्थित होते.
त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना स्वंयसेवी संस्था अध्यक्ष श्री. शशिकांत मोकाशे यांनी बाल विवाह प्रतिबंधक कायद्याची भुमिका त्यापासून संरक्षण पिडीत कुटुंबाचे होणारे नुकसान बालविवाह थांबविलयास होणारे फायदे देशाला सुधरूढ समाज निर्मिती साठी प्रेणादायी मार्गदशन केले. तसेच श्री. अजय साखरकर यांनी मुलीच्या आई वडीलांना कुटुंबाला भेट देत कुटुंबास भविष्यात उद्भवणा-या कायदेशीर अडचणी यावर मार्गदर्शन केले.
त्यानंतर गावकरी आणि मुलीच्या आई वडीलांनी सदरचे नियोजीत बालविवाह करणार नाही याची हमी देत बाल कल्याण समिती समोर हजर होण्याची ग्वाही दिली.
या संपूर्ण प्रकारात खेदाची बाब निर्दशनास आली की, बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हाणून शासनाने ज्या कर्मचा-यांची नियुक्ती केली त्यांचा या विषयात कोणतीही सकारात्मक भूमिका, दृष्टीकोन, तळमळ दिसून आली नाही. तसेच आंगणवाडी बालवाडी दाखल खारीज रजिस्टर मध्ये तेथून शिकून गेलेल्या मुली ज्यांचे वय १४/१५ वर्ष होवूनही तसेच त्यांच्या शालेय प्रमाणपत्र व पुढील शिक्षण झाले असतांना आंगणवाडी बालवाडी रेकार्ड वर जुने व नवीन रेकार्ड अजूनही पेन्सीलने लिहलेला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे इथे रेकार्ड वर दबावापोटी फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या संपूर्ण बालविवाह प्रतिबंध कार्यक्रमात जिवती चे उपविभागीय अधिकारी श्री. सुशील नायक, पोलिस सहाय्य निरीक्षक सचिन जगताप, अंगणवाडी सेविका यांचे वेळोवेळी मोलाचे सहकार्य लाभले.

श्री. अजय साखरकर ,जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चंद्रपूर

*****************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

***********************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here