* त्या नरभक्षी वाघाला जेरबंद करा – आ. किशोर जोरगेवार *

0
44

***********************

* वाघाच्या हल्यात मृत्यु झालेल्या पुरुषोत्तम बोपचे यांच्या कुटुंबीयांची आमदार किशोर जोरगेवार यांनी घेतली भेट *

 ***************************

 वाघाच्या हल्यात मृत्यु झालेल्या इंदिरा नगर येथील रहिवासी ३९ वर्षीय पुरुषोत्तम चिंतामन बोपचे यांच्या कुंटुबीयांची आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट घेतली असून मृतकच्या कुटुंबीयांना तात्काळ शासकीय मदत देण्याच्या सुचना केल्या आहे. सोबतच या भागात मुक्तसंचार असलेल्या नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना पाठविले आहे.

***********************

इंदिरा नगर येथील रहिवासी पूरुषोत्तम चिंतामन बोपचे हे सकाळच्या सुमारास कुड्याचे फुल वेचण्यासाठी एमईएल लगतच्या जंगलात गेले होते. सायंकाळ पर्यंत ते घरी परत न आल्याने घरच्यांनी जंगलात त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळुन आला होता. वाघाच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यु झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मृतक यांच्या इंदिरा नगर येथील घरी जात कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी मृतकाच्या पत्नीला वन विभागाने कंत्राटी पध्दतीवर नोकरीत सामावून घेण्याच्या सूचना त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, आनंद रणशूर, नितेश गवळी,  डॉ. गरिधर येडे, पप्पु बोपचे, तुषार येरमे, संजय पटले, सोनू मडावी, पंकज चटप, आदींची उपस्थिती होती.

*************************

दिड महिण्यातील ही दुसरी घटना असुन यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यु झाला आहे. येथे नागरीवस्ती आहे. अशात नरभक्षक वाघाचा येथे मुक्त संचार असने गंभिर बाब आहे. वन विभागाने याकडे लक्ष द्यावे, या नरभक्ष वाघाचा शोध घेत त्याला जेरबंद करावे अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना पाठविले आहे.

***************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

*************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

ReplyForward

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here