* महाराष्ट्रातील आदिवासी बहुल चंद्रपूर -गडचिरोली इतिहासाने खूप काही शिकवले *

0
59

**************************

-हमरास एम .के. 

************************

चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील गोंड राजांच्या ऐतिहासिक वारसा किल्ले व गड विविध गुंफा प्राचीन पौराणिक मंदिरे वन वैभवानी नटलेला परिसर निसर्गरम्य पर्यावरण व संवर्धन यांनी अक्षरशः भारावून गेलो. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी मुक्काम करीत दहा दिवस सायकलने भ्रमण करीत असताना आपला अनुभव चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला निरोप देताना महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला भावना विवश होऊन भावना स्पर्शी संवाद रवींद्र तिराणिक यांच्याकडे कथन केला.
निसर्ग व पर्यावरणाशी समतोल राखत आदिवासी संस्कृती जपत ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या मायभूमीत दहा दिवसांचा आपुलकी व जिव्हाळा पूर्ण मुक्काम अनुभव खूप काही सांगून गेला. महाराष्ट्राच्या मायभूमीत शिवछत्रपतींचा गडकिल्ल्यांचा अभ्यास करताना चंद्रपूर गडचिरोलीत जिल्ह्यात आदिवासी संस्कृतीचा ही अभ्यास करता आला. खऱ्या अर्थाने आदिवासी मावळे नसतील तर गड किल्ले शाबूत करता आले नसते . असे स्पष्ट मनोगत त्यांनी मांडले.
जंगल साबुत राखून पर्यावरण संरक्षण व संवर्धन निसर्गाचा समतोल बाळगणाऱ्या जंगल दर्यातील कपारीतील उंच टेकड्यावरील पाड्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी संस्कृतीकडून सर्वांनी बरेच काही शिकण्यासारखे आहे. ऐतिहासिक किल्ले -मंदिरे पौराणिक बाबी, निसर्गालाच देव म्हणणाऱ्या आदिवासी कडून बरेच काही शिकलो असे तो म्हणाला.
जंगलातील नक्षलवाद्यांच्या भीतीने प्रशासनाचा विकास अजूनही खऱ्या अर्थाने तिथपर्यंत पोहोचले नाही. प्राचीन मंदिरे व पायवाट रस्ते ,संस्कृती अजूनही विकासाची वाट पाहत आहे . प्रचंड भीतीमुळे तिथपर्यंत जाण्यास कोणी धजावत नाही व तिथे जाण्याचा विचार केला तर कोणी मदत करेल अनअपेक्षितच आहे अशा परिस्थितीत निर्भयपणे जाण्याचा योग आला हा माझ्यासाठी विलक्षण प्रसंग होता. गडचिरोली जिल्ह्यातील जंगल परिसरात टिपागड ,सुरजागड ,वैरागड ची पाहणी करता आली. तिथल्या आदिवासी संस्कृतीशी समरस होता आलं हे माझ्यासाठी विलक्षण अविस्मरणीय होतं केरळच्या हमरास एम. के. सायकल यात्रीला प्रथमता चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करताच भद्रावतीत सामाजिक कार्यकर्ते पत्रकार ,कलाअकादमीचे संचालक रवींद्र तिराणिक यांनी भव्य स्वागत केले. चंद्रपूर गडचिरोली च्या पुढील प्रवास सुखकर होण्यासाठी तिराणिक यांनी केलेल्या मदतीच्या संदेशेला अनेक सेवाभावी मित्रमंडळी व पत्रकार संघ आदींनी शेवटपर्यंत दाद दिली.
————————————–
केरळच्या हमरास एम. के . २६वर्षीय तरुण अवलियाला महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची भुरळ चंद्रपूर -गडचिरोली इतिहासकालीन किल्ल्यांना दिली भेट.
—————————————-
चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात दहा दिवस मुक्काम.
—————————————-
हमरास ने महाराष्ट्रात सायकलने ३६५दिवस पूर्ण करीत १ मे महाराष्ट्र दिनी २०२३ला चंद्रपूर जिल्ह्यात स्वातंत्र्याची बिगुल फुंकणारी क्रांती भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिमूर तालुक्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जन्मदिनाच्या दिनाच्या प्रसंगी एक वर्ष पूर्ण केलं हा विशेष विलक्षणीय अविस्मरणीय प्रसंग समजावा लागेल.
————————————–
दहा हजार किलोमीटर ३५५दिवस सायकल प्रवास करून ३७० किल्ल्यांना भेट देण्याचा निर्धार करीत १७६किल्ल्यांना भेट देऊन केरळचा हमरास एम. के . यवतमाळ वडकी मार्गे चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील पाच दिवसीय मुक्कामास्तव गड किल्ले पौराणिक मंदिरे व ऐतिहासिक बाबींना भेटी दिल्या.
महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांचा संस्कृतीचा अभ्यास करीत संपूर्ण महाराष्ट्रातील ३७० गडकिल्ल्यापैकी १७६ गडकिल्ल्यांना भेट देत १ मे २०२२ रोजी केरळ राज्यातून कोटपूराम येथील स्वगृही कालीकट (मडतील कैकादुंडी) खेड्यातून सायकलने प्रवास करीत प्रथमता शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात करून निघालेला सायकल स्वार हमरास २६ वर्षीय तरुण अवलिया मध्यम गरीब कुटुंबातीलअसून हमरासचे वडील वैशाद एम .के. आई पुर्णिमा एम. के. आणि दोन भाऊ आहेत वडील टेलरिंग चा व्यवसाय करतात बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतलेल्या हमरास ने कुटुंबाला मदत म्हणून सौदी अरेबिया व दुबई येथे चालक म्हणून नोकरी केली. या काळात सोशल मीडिया व youtube वर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचून काढला त्यानंतर त्याने महाराजाविषयी अधिकाधिक माहिती जाणून घेण्यासाठी ३७०गडकिल्ल्यांना भेटी देण्याचा संकल्प करीत १मे २०२२पासून मार्गस्थ झाला आतापर्यंत १५ जिल्ह्यातील १८२किल्ल्यांना भेट दिली आहे. हमरास ला मल्याळम ,कन्नड, तेलुगु ,अरेबिक, हिंदी आणि अंग्रेजी या भाषेचे ज्ञान आहे.
काही मोजके किल्ले सोडून महाराजांच्या ऐतिहासिक इतिहासाचा वारसा असलेल्या अनेक किल्ल्यांची पडझड झाली असून या किल्ल्याकडे शासनाचे लोकप्रतिनिधीचे व राज्यकर्त्याचे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्याने व्यक्त केली. महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीला कळावा यासाठी किल्ल्याचे संवर्धन करण्याची गरज आहे असे मनोगत त्यांनी मांडले. या अवलिया तरुण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रेरित होऊन महाराष्ट्रातील अनेक गडकिल्ल्यांचा अभ्यास करीत भेटी देत तब्बल ३५५दिवसानंतर चंद्रपुरात दाखल झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वप्रथमता भेट भद्रावती येथील गोंड राजांच्या किल्ल्यांना व रवींद्र तिराणिक यांच्या कला अकादमीला भेट दिली प्रसंगी तिराणिक कुटुंबाच्या वतीने आपुलकी व जिव्हाळा पूर्ण प्रेमाच्या स्वागताने मी भारावून गेलो असे तो म्हणाला .कला अकादमीतच एक दिवसीय मुक्काम करीत चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील पुढील दौऱ्याच्यासायकल यात्रेच्या संदर्भात सर्व संपर्क वार माहिती जाणून घेतली. भद्रावती येथील ऐतिहासिक बुद्ध लेणी ,गणेश मंदिर ,भद्रनाग मंदिर, पार्श्वनाथ मंदिर विविध ऐतिहासिक बाबीची माहिती जाणून घेतली. चंद्रपूर जिल्ह्याच्या हमरास प्रथम स्वागतार्थ कला अकादमीचे सर्व प्रतिनिधी मंडळ, संचालक, जनमंच सदस्य, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक, गौरव चामाटे, भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव संस्कार शिबिरात असंख्य बालकांच्या उपस्थितीत हमरास एम. के .यांचा गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रसंगी संस्कार शिबिरात आपला अनुभव व उद्देश शिवछत्रपतींच्या कार्याने प्रभावित होऊन चाललेला प्रवास त्यांनी मांडला. पुढील प्रवास
रवींद्र सरांच्या संपर्कातून चंद्रपूर नगरीतील सायकल स्वार ग्रुप चे प्रमुख अनिल टहालानिया व सायकल मित्र मंडळ, अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे शशिकांत मोकाशे, दशरथ वाघमारे यांनी स्वागत केले.
सायकल यात्री हमरास त्यांच्या सायकल ला तांत्रिक अडचण आल्यामुळे चंद्रपूर येथे शासकीय विश्रामगृहात रात्रीचा मुक्काम केला. प्रसंगी माजी खासदार, केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांच्या कार्यालयातून विशेष निमंत्रण आल्यामुळे पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख रवींद्र तिराणिक, शशिकांत मोकाशे, भाजपाचे खुशाल भाऊ बोंडे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ घरटे, कलाध्यापक संघाचे प्रतिनिधी सुदर्शन बारापात्रे ,सार्थक बारापात्रे, विकास खट्टी, रामदेवजी राऊत, राहुलजी बनकर यांच्या उपस्थितीत माजी खासदार केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या स्वगृही जनसंपर्क कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
हमरास दुसऱ्या दिवशी चंद्रपूर वरून माणिकगड किल्ला, राणी हिराई महल, चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली, अंकलेश्वर देवस्थान व विविध किल्ल्यांना भेट दिली. चंद्रपूरच्या इतिहासाने पौराणिक बाबीने हमरास भारावून गेला . पुढील प्रवासाकरता रवींद्र तिराणिक यांनी मित्र मंडळ समाजसेवी संस्था व पत्रकार संघांना स्वागताकरिता सुचित केले .चंद्रपुरातील दोन दिवशीय मुक्काम आटपून पुढील गडचिरोलीच्या दिशेने मुल मार्गावर बस स्टँड जवळ गांधी चौक येथे तालुका पत्रकार संघाच्या वतीने मुल शहरात केरळचे सायकल यात्री हमरास एम .के. यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम, सचिव विनायक रेकलवार, उपाध्यक्ष युवराज चावरे, सदस्य दीपक देशपांडे, चंद्रकांत मणियार, अमित राऊत उपस्थित होते. तर प्रमुख मार्गावर
सावली येथे पत्रकार मित्र मोरेश्वर उद्योजवर यांनी स्वागत केले. गडचिरोली मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे सामाजिक कार्यकर्ते गोपाल रायपुरे, विद्या रायपुरे विजय नरचुलवार, अविनाश कथले, पत्रकार रायपुरे ,रिहांश रायपुरे यांनी आदत कवितासंग्रह बुद्ध आणि धम्म पुस्तक भेट देऊन स्वागत केले. हमरास एम .के यांनी तीन दिवस मुक्काम व्याड खुर्द येथे रायपुरे यांच्या निवासस्थानी केला. यादरम्यान गडचिरोली मधील गडकिल्ल्यांच्या अभ्यास भ्रमती करिता पोंभुर्णा येथील पत्रकार सुरज गोरंतवार यांनी स्वतः प्रत्यक्षात सोबत राहून सहकार्य केले.
गडचिरोली ते पोंभुर्णा ,मुल सिंदेवाहि मार्ग नेरी, नेरीत हेमाडपंथी राक्षस किल्ल्याला भेट दिली. प्रसंगी महत्वपूर्ण संदर्भीय सविस्तर माहिती नेरी वासियांकडून जाणून घेतली . हमरासच्या नेरी येथे आगमना निमित्य नागरी सत्कार करण्यात आला . यात डॉ श्यामजी हटवादे डॉक्टर जगदीप पिसे, रवी चुटे, दादाराव पिसे, फ्लॅश हिंगे अशोक पंधरे ,किसन पंधरे, पांडुरंग मेश्राम, दिवाकर पिसे प्रामुख्याने उपस्थित होते. गुरुदेव सेवा मंडळाच्या सानिध्यात नेरीत मुक्काम करीत पुढे भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे नेतृत्वात अग्रेसर असलेल्या स्वातंत्र्याचे बिगुल फुंकणाऱ्या क्रांती भूमीत चिमूर ला भेट दिली .प्रसंगी काँग्रेसचे राजू दांडेकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्रीहरी सातपुते व पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
महाराजांचे कार्य युद्धनीती, हिंदवी स्वराज्यासाठी दिलेला लढा, महाराजांचीनीतीमूल्ये तत्वे, महाराजांच्या केलेल्या कार्यकर्तृत्वाने हा युवक भारावून गेला आणि त्यातून शिवाजी महाराजांचे अधिकाधिक माहिती जाणून घेण्याची ध्येय उराशी बाळगून या तरुण अवलियाने प्रतापगड किल्ल्यावरून १ मे २०२२ पासून गडकिल्ल्यांची सफर सुरू केली असून, ती ६ जून २०२४ रोजी रायगड किल्ल्यावर संपणार आहे. तब्बल ४५हजार किलोमीटरचा प्रवास करून ३४३गडकिल्ल्यांना भेटी देण्याचा संकल्प युक्त त्याचा निर्धार आहे केरळ मध्ये शालेय अभ्यासक्रमातून. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाविषयी, त्यांच्या जीवनाविषयी ,त्यांचा पराक्रम व गडकिल्ल्याविषयी शिकविले जात नाही. वाचनातून कार्य समजले मी भारावून गेलो. एकीकडे माझे वजन सुद्धा वाढले होते. शरीराच्या फिटनेससाठी व शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रभर सायकल यात्रा करण्याचेठरविण्याचे हमरास सातत्याने सांगतो महाराष्ट्रात आल्यानंतर काही गड किल्ले सर केल्यानंतर माझी सायकल बिघडली. मात्र, साताऱ्याचे उदयराजे भोसले यांनी आपल्याला भ्रमतीसाठी नवीन सायकल दिल्याचे तो आवर्जून सांगतो. या नवीन सायकलने मला ऊर्जा मिळाली असून, राजगड, तोरणा, लोहगड, विजापूर सुधागड ,रायेश्वर, केजळगड यासह १७९ किल्ल्यावर भ्रमंती करण्यात आली आहे. प्रवासामध्ये महाराष्ट्र अनेक लोक मदत करतात. ठिकठिकाणी स्वागत होते. काही विलक्षण प्रसन्न सांगताना तो म्हणाला लोणावळ्याच्या जंगलात सायकल यात्रा करताना तो काही तास हरविला होता. येथील दुर्गप्रेमींनी त्याला मदत करीत मुख्य मार्गावर आणल्याचे
हमरास नी सांगितले. स्थानिक लोकांकडून मदत घेत त्याचा एकट्याचा प्रवास सुरू आहे.
—————————————-
सायकल, हेल्मेट, चार प्रकारचे टॉर्च, रात्री राहण्यासाठी तंबू, लाकडी स्टोव्ह, जेवण बनविण्याचे काही साहित्य, मोबाईल, स्वतःचे दोन जोडे, कपडे, हॅन्ड ग्लोज सायकल दुरुस्तीचे साहित्य आधी इतर असे तत्सम साहित्य घेऊन १ मे २०२२ पासून सायकलचा प्रवास सुरू झाला.
—————————————
गेली बारा महिने सातत्याने निर्भयपणे महाराष्ट्रात गडकिल्ल्यांची व तेथील इतिहासाची माहिती जाणून घेण्याकरता प्रचंड भटकंती करतोय. चंद्रपूर जिल्ह्यात आजच्या घडीला ३६५ दिवस पूर्ण करीत एक मे ला महाराष्ट्र दिनी एक वर्ष पूर्ण झाले आहेत ही एक विशेष बाब आहे.
—————————————-
काही क्वचितच विशेष किल्ले सोडलेत तर महाराजांच्या इतिहासाचा वारसा असलेला अनेक किल्ल्यांची पडझड झाली आहे. ते किल्ले दुर्लक्षित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अनेक किल्ल्यावर दारूच्या बाटल्या, किल्ल्यांच्या भिंतीवर कोरलेली नावे ,यामुळे किल्ल्यांची दुरावस्था झाल्याचे सांगत किल्ल्याची सुरक्षा करण्याची व नव संजीवनी देण्याची गरज आहे असे स्पष्ट मत सायकल यात्री हमरास एम. के . यांनी महाराष्ट्र दिनी चंद्रपूर जिल्ह्याचा निरोप घेताना चंद्रपूर -गडचिरोली जिल्ह्याचा संपर्क दौऱ्यात प्रमुख सहकार्य करणारे रवींद्र तिराणिक यांच्याशी बातचीत करताना मांडले.
————————————–

दहा हजार किलोमीटर पेक्षा जादा प्रवास करीत पुढील किल्ल्यांच्या भ्रमती करिता भिवापूर, उमरेड, पवनी, भंडारा मार्गे प्रतापगड, गोंदिया असा रवाना झाला आहे. प्रसंगी पत्रकार प्रमोद राऊत, विलास मोहिनकर, जितेंद्र सहारे, रामदास ठुसे, जावेद पठाण, श्रीहरी सातपुते आदींनी पुढील प्रवासाला शुभेच्छा देत निरोप दिला.

********************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*******************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here