* साठेबाजीवर आळा घालत कबड्डी आणि पंगा हे कापसाचे वाण शेतक-यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करा – आ. किशोर जोरगेवार *

0
39

*************************

*:जिल्हाधिकारी यांची भेट घेत केली मागणी *

*********************************
कबड्डी आणि पंगा हे कापसाचे वाण एका दिवसात बाजारपेठेतुन बेपत्ता झाले असुन 800 रुपये प्रति बोरीचे हे वाण 1300 ते 1400 रुपयात शेतक-यांना विकल्या जात असल्याचा प्रकार आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या लक्षात आणून दिला असुन या सदर साठेबाजीवर आळा घालुन कबड्डी आणि पंगा हे कापसाचे वाण शेतक-यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.
आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेतली असून सदर मागणी केली आहे. यावेळी मतदार संघातील विविध विषयांवरही आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याशी चर्चा केली आहे.
चंद्रपूरात कपासीचे पिक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. पावसाळी हंगाम सुरु झाल्याने शेतकरी आपल्या शेतीच्या कामाला लागला आहे. कापूस उत्पादक शेतक-यांनी कबड्डी आणी पंगा या कापसाच्या वाणाला पसंती दिली आहे. काल 1 तारखेपासून सदर वाण प्रकार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. मात्र काही तासातच सदर वाण प्रकार बाजारपेठेतून गायब झाल्याचे समोर आले असुन सदर वाण संपले असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. हा प्रकार चिंताजनक असुन मोठी साठेबाजी होण्याची शक्यता वर्तवीली जात आहे. 800 रुपये प्रति बोरी प्रमाणे मिळणारे हे वाण 1300 ते 1400 रुपये अशा महागड्या भावाने शेतक-यांना विकल्या जात असल्याने शेतक-यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या प्रकारामुळे शेतक-यांमध्येही मोठा रोष निर्माण झाला असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान आज शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेत सदर सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला आहे. या वाणाची साठेबाजी करणा-या कृषी केंद्रावर लक्ष ठेवून कार्यवाही करण्याची मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असुन मागणी असलेले कबड्डी आणि पंगा हे वाण मुबलक प्रमाणात उपलब्ध करावे अशी मागणीही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. जिल्हाधिकारी यांनीही याची तात्काळ दखल घेतली असून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे म्हटले आहे.

*******************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

**********************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here