*हा चळवळीतला खऱ्या, प्रामाणिक, निष्ठावान कार्यकर्त्या चा सत्कार !*

0
35

***************************

* गोपी मित्रा यांचा मानपत्र देऊन सन्मान व सत्कार *  

*********************************

चंद्रपूर शहरातील विविध विचार, संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक जयंत टॉकिजसमोरील बॅ. राजाभाऊ खोब्रागडे पुतळा परिसरातील गोपी मित्रा यांच्या चहा सेंटरवर सकाळी आवर्जून घुटमळतात. व्यवसायातील नफ्या-तोट्याचा विचार न करता गोपी नावाचा हा कार्यकर्ता २५-३० वर्षांपासून चहा विकत आजही त्याच स्थितीत आहे. आर्थिक संकटे झेलून केवळ प्रपंच चालविण्याच्या पलीकडे तो गेला नाही. मात्र, संविधाननिष्ठ चळवळीत सच्चा कार्यकर्ता म्हणून राबतो. हीच त्याची खरी कमाई असल्याने चंद्रपुरातील मित्र परिवारतर्फे रविवारी मृणालिनी सेलिब्रेशनमध्ये सभागृहात गाेविंद ( गाेपी ) यांच्या सहृदय सत्कार करण्यात आला.

**************************

अध्यक्षस्थानी आंबेडकरी साहित्य प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. इसादास भडके सर हाेते.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हनुन राष्ट्रीय पुराेगामी पत्रकार संघाचे राज्य सचिव तथा दैनिक कळंब नगरीचे उप संपादक नीलेश ठाकरे यांच्या हस्ते प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथा महाप्राण जाेगेंद्रनाथ यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलीत करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. मंचावर प्रमुख पाहुणे म्हनुन डॉ.अमल पोद्दार, आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक कोमल खोब्रागडे, सूर्याश साहित्य व सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष इरफान शेख, रमेशचंद्र राऊत, रिपाई (खोरिपा) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष देशक खोब्रागडे, मथुआ महासंघाचे गोसाई दुलालदास व अन्य उपस्थित होते,

*****************************

गोपी मित्रा यांचा सपत्नीक सत्कार करताना प्रा. इसादा भडके, निलेश ठाकरे, काेमल खाेबरागडे, देशक खाेबरागडे, व ईतर मान्यवरांनी मानपत्र व स्मृतीचिन्ह देवुन गाेपी मित्र व त्यांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.

**************************

सपत्नीक सत्काराने गोपी मित्रा भावुक झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल ही माझी श्रद्धास्थाने आहेत. चळवळीसाठी खस्ता खाल्ल्या. अनेक माणसे जोडली. कार्यक्रमांसाठी पुढाकार घेतला. पुढेही घेत राहीन. चळवळीचा कार्यक्रम झाला की, में चला चाय बेचने.. ही माझी जगण्याची तन्हा. पण याचे मला दुःख नाही. मी माणसे समाज जोडतो, ही माझी कमाई, अशी भावना गोपी मित्रा यांनी या वेळेस व्यक्त केली.

*******************************

मनाेगत व्यक्त करतांना प्रा.काेमल खाेबरागडे पुढे म्हनाले गाेपी मित्रा हा जाेगेंद्रनाथ मंडल यांची प्रेरणा घेऊन काम करतो. असा प्रामाणिक कार्यकर्ता चळवळीला ताकद देत असतो. माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांचा मोठा कार्यक्रम गोपीने चंद्रपुरात घडवून आणला होता. त्यावेळची एक आठवण आंबेडकरी विचारांची प्रामाणिक निष्ठा दर्शविणारी होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. इरफान शेख यांनी गोपीकडे आता नेतृत्व देण्याचे आवाहन केले. डॉ. पोद्दार यांनी बंगाली समाज यांनी अश्या चळवळीच्या कार्यक्रत्याचा सत्कार अजुन पर्यंत नाही केला म्हनुन खंत व्यक्त केली. निलेश ठाकरे यांनी गाेपी मित्रा यांचे चाहाचे प्रतीष्ठान एक दिवस बंद असले तर संपुर्ण चाैक हा माैन दिसुन येत असताे असे म्हनत अश्याच चळवळीत काम करणार्या प्रामाणिक, निष्ठावांत कार्यक्रत्याची दखल घेवुन सन्मान व सत्कार हाेने अत्यंत गरजेचे आहे म्हनुन या कार्यक्रमाचे आयाेजन प्रा.भडके सर आणि मि स्वता पुढाकार घेत व गाेपी मित्रा परीवाराच्या सहकार्याने घडवुन आनला म्हनुन आपले मनाेगत व्यक्त केले. रमेशचंद्र राऊत यांनीही गोपीच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांवी शुभेच्छा दिल्या. गडचिराेली येथिल वन विभाचे अधिकारी मा. किशाेर मानकर सर यांनी गाेपी मित्रा यांना पाच हजार रू. चा धनादेश भेट वस्तु स्वरूपात देवुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. इसादास भडके यांनी सत्कार घेण्यामागची पार्श्वभूमी विशद केली. गोपी मित्रासारख्या खऱ्या कार्यकर्त्यामुळे चळवळ जिवंत असते. चळवळ जिवंत ठेवण्यासाठी अशा व्यक्तींचा सत्कार आवश्यक आहे, याकडे लक्ष वेधले. गौरवपत्रात गोपी मित्राच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक व मानपत्राचे वाचन धनंजय तावाडे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन संताेष साखरकर यांनी केले. साखरकर यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात युवकांनी पुढे येण्याचे आव्हान केले. त्या करिता आता वरिष्ठांनी आपली कुर्सी साेडुन युवकांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहण्याची विनंती केली.या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर व संघटनांचे प्रतिनिधी तर उपस्थित होते. या वेळेस साेबत सभागृहात गाेपी मित्रा यांचा मित्र परिवार प्रत्यक्ष माेठ्या संख्येने गाेपी यांना शुभेच्छा देण्याकरिता उपस्थीत हाेता.

*****************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*****************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here