*शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची संगणक प्रणाली मध्ये नोंद करावी – सचिन कोतपल्लीवार*

0
33

****************************

*भाजपा शिष्ट मंडळाचे मनपा आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन*
—————————————-
भारतीय जनता पार्टी ( मध्य) बाजार मंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे वने, सांसकृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या मार्गदर्शनात शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राची संगणक प्रणाली मध्ये नोंदणी करण्यासंदर्भात निवेदन सादर करून मागणी करण्यात आली निवेदन सादर करतांना भारतीय जनता पार्टी मध्य बाजार मंडळाचे अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार यांनी निवेदनात नमूद असलेल्या बाबी सांगितल्या त्यामध्ये महानगरपालिका व जिल्हापरिषद अंतर्गत येणाऱ्या शाळां मध्ये 50 ते 60 वर्षा पूर्वी शाळा सोडल्याच्या प्रमाणपत्राच्या नोंदी नोंद वही मध्ये नोंद करून असून त्या वही दैनंदिन शाळेत वापरत येतात त्यामुळे त्या वही मधील काही माजी विद्यार्थ्यांची नावे दिसेनासे झालेले आहेत जर त्या वही मधील नावांची संगणक प्रणाली मध्ये नोंद करून ठेवली तर शाळेत येणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शाळा सोडल्याचे प्रमाणपत्राच्या नोंदी शोधण्यास अडचण निर्माण होणार नाही तसेच या मुळे वेळेची बचत होईल असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे सदर निवेदन सादर करतांना ओबीसी मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष विनोद शेरकी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष रवींद्र चहारे,महानगर सचिव राजेंद्र खांडेकर,अरविंद कोलणकर,नकुल आचार्य,चांद पाशा, सावन कालीवाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती….

********************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*******************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here