ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मन की बात कार्यक्रम

0
35

विश्वगौरव, पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या लोकप्रिय “मन की बात” कार्यक्रमाचे रविवार, १८ जून रोजी सकाळी घुग्गुस येथील बूथ क्र. ३२८ वरील मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सामुहिक दृकश्रवण केले.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, “मन की बात”च्या माध्यमातनं मा. मोदीजी प्रत्येक वेळी नव्या विषयाला घेऊन जनसंवाद साधतात. आजच्या संवादात पर्यावरण, जल, क्रिडा, सांस्कृतिक तसेच देशातील अन्य महत्वपूर्ण अशा सामान्यांना माहीत नसलेल्या घटनांची माहिती त्यांनी सर्व श्रोत्यांना करून दिली. नुकत्याच रायगडावर झालेल्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहोळ्याचे सुत्य उल्लेखही त्यांनी आज केले. यासोबतच येत्या २५ जूनच्या आणिबाणी दिनाच्या काळ्या आठवणी देशातील तरूणांनापर्यंत पोहचवा जेनेकरून त्यांनाही भारतीय लोकशाहीचे महत्व आणि वाटचाल अनुभवता येईल असे आवाहन त्यांनी आजच्या मार्गदर्शनात केले.
मा. मोदीजींची मन-की-बात दरवेळीच काहीना काही नवा अनुभव आणि प्रेरणा देत असते.

यावेळी भाजपाचे अमोल थेरे, गणेश कुटेमाटे, सुरेंद्र भोंगळे, सुरेंद्र जोगी, प्रवीण सोदारी, सिनू कोत्तूर, वमशी महाकाली, हेमंत पाझारे,अक्षय झूरळे, ओम निखूरे, प्रणय शेंडे, मुकेश डुडुरे, संतोष ताजने, संदीप ताजने, वैभव बल्की, बाळकृष्ण खिरटकर, शंकर रासनाला, कैलास सोदारी, सुशील डांगे, सुनंदा लिहीतकर, खुशबू मेश्राम, नेहा कुम्मरवार आदिंची सोबत उपस्थिती होती.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here