************************
सामाजिक न्याय विकास निधी अंतर्गत मंजुर 50 लक्ष रुपयांच्या बाबूपेठ येथील विविध विकासकामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी नगर सेविका पुष्पा मुन, सोनल भगत, संजय मेश्राम, यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, कार्तीक बोरेवार यांच्यासह स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
**************************,
आमदार किशोर जोरगेवार यांनी मतदार संघातील विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध केला आहे. या निधीतून मतदार संघातील विविध प्रलंबीत कामे प्राथमिकतेने पुर्ण केल्या जात आहे. ग्रामिण भागात समाज भवन व इतर मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध केल्या जात आहे. तर शहरी भागातील मुलभुत कामे प्रगतीपथावर आहे. यात मतदार संघातील सात अभ्यासिकांचे काम सुरु आहे.
*****************************
दरम्यान बाबुपेठ येथील विकासकामे पुर्ण करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. नुकताच येथील दुर्लक्षीत असलेल्या इग्लाज भवानी वार्डातील विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी 5 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून येथे मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. तर बाबुपेठ येथील समता चौकात नाली आणि सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी स्थानिकांच्या वतीने करण्यात आली होती. यासाठीही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सामाजिक न्याय विकास निधी अंतर्गत 50 लक्ष रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. या निधीतून पूर्ण होणार असलेल्या विकासकामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले.
*******************************
चंद्रपूर मतदार संघातील दुर्लक्षीत भागाचा विकास करण्याचा संकल्प आपण केला आहे. क्रिष्ण नगर, बाबुपेठ या भागात आपण विविध विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे. हा शेवट नाही. नागरिकांची मागणी येईल ते काम करण्याची आमची तयारी आहे. नागरिकांना अपेक्षीत असा विकास करण्याचा आपला संकल्प आहे. बाबुपेठ येथील महादेव मंदिर जवळ आपण जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च करुन अभ्यासिका तयार करत आहो यातील दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे ते यावेळी म्हणाले. या भुमीपूजन कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
****************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
************************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793