* 2 जुलैला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार *

0
29

**********************

१० वी आणि १२ विचा निकाल नुकताच जाहिर झाला असून यात प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने  2 जुलै २०२३ रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतीक सभागृह, चंद्रपूर येथे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

***********************

दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा 10 वी आणि  12 वीच्या परिक्षेत यश संपादन करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या सत्कार कार्यक्रमात 12 विच्या परीक्षेत 75 टक्के च्या वर गुण प्राप्त करणाऱ्या आणि 10 विच्या परिक्षेत 80 टक्के च्या वर गुण प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यासाठी सदर गुणवंत विद्यार्थ्यांना जैन भवन जवळील आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात दि. ३० जून २०२३ पर्यंत गुणपत्रिकेची प्रत जमा करावी किंव्हा https://forms.gle/pFzKCcyscktf2fuV7 या संकेत स्थळावर नोंदणी करून घ्यावी  असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला गुणवंत विद्यार्थी,  पालक, शिक्षक वृंद, संस्थापक अध्यक्ष तसेच महानगरातील विविध क्षेत्रातील नागरिक व शिक्षण क्षेत्राशी निगडीत मान्यवर व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* 

************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here