********************
*भाजपा जिल्हाध्यक्ष(श)राहुल पावडे यांचा सवाल*
***********************
संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशाच्या बहुतांश भागात पावसाने थैमान घातले आहे.याचंही भांडवल केले जाते ही शोकांतिका आहे.हीच स्थिती चंद्रपूरात आहे.18 जुलैला पाऊस अक्षरशः हजारोंच्या घरात शिरला.हे होऊ नये म्हणूनच विद्यमान पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी 2016 मध्ये इराई नदीचे खोलीकरण केले.त्या नंतर या महानगराला पाण्याचा फटका बसला नाही.या उलट नंतर 6 वर्षाचा कालावधी लोटला.इराईत पुन्हा गाळ साचला.तत्कालीन महाविकास आघाडी मधील पालकमंत्री व राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 4 एप्रिल 2022 ला इराईच्या खोलीकरणाचे काम गाजावाजा करीत सुरू केले,पण मशीनसाठी डिझेल नसल्याने काम ठप्प झाले.त्यामुळेच चंद्रपूरकरांच्या घरात 18 जुलैला पाणी शिरले असा आरोप भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष(श)राहुल पावडे यांनी केला आहे.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विद्यमान पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यावर आरोप करण्यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना जाब विचारण्याची हिम्मत दाखवावी.असे आवाहनही त्यांनी केले आहे.
**************************
जगात सर्वात सोपे काम कोणते असेल तर अभ्यास न करता आरोप करणे होय.हेच काम सद्या विरोधकांकडून सुरू आहे.18 जुलैला पावसामुळे उदभवलेल्या स्थिती बाबतही हेच सुरू आहे.महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या नद्या ओव्हर फ्लो झाल्या आहेत.18 तारखेचा पाऊस थांबल्यावर 3 तासात सर्व पाणी निघून गेले.हे विसरून चालणार नाही.मनपा प्रशासनाने योग्य नियोजन केले म्हणूनच पाणी ओसरले.शहरात 18 जुलैला 24 तासांत तब्बल 242 मिमी मुसळधार पावसाने रेकॉर्ड ब्रेक केला. मागील 100 वर्षांत जुलै महिन्यात 24 तासात पडलेला हा सर्वाधिक पाऊस ठरला. यापूर्वी 14 जुलै 1884 मध्ये 254 मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली होती.इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल याची पुसटशी कल्पना कुणालाच न्हवती.या नैसर्गिक आपदाचा अभ्यास आरोपकर्त्यांनी करायला हवा.ढगफुटी सदृश्य पाऊस झाला,याला पालकमंत्री जवाबदार आहे का.?पालकमंत्रीवर आरोप करणाऱ्यांचा सत्कार करायला हवा.अशी खोचक टिका पावडे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे होते.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे इराई दर्शन घेऊन गेले,काय झाले नंतर..?ते यांनी जनतेला सांगावे.
आता निवडणूक पुढे आहे,म्हणून ही चमकोगिरी विरोधक करीत आहे.पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी केलेली कामे जनतेला माहीत आहे.तो विकास दिसून पडतो.नागरिकांना भ्रमित करणे आणि खोटं रेटून बोलणे,हा महाविकास आघाडीतील नेत्यांचा एकमात्र उपक्रम आहे. प्रसिद्धीसाठी हापापलेल्या या नेत्यांना जनतेने धडा शिकवावा,असेही आवाहन पावडे यांनी केले आहे.
*************************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793