* अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने चंद्रपुरात दमदार हजेरी लावली मात्र या पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत करून टाकले *

0
22

*************************

* सम्राट अशोक चौक, घुटकाला प्रभाग *  

**************************

पावसाळ्यापूर्वी नाल्याची सफाई व्यवस्थित न झाल्याने शहरात पुरजन्य स्थिती निर्माण झाली, मात्र आजही शहरात अस्वच्छतेचे वातावरण आहे.

***************************

* मनपाच्या दुर्लक्षिततेपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परीणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. *

****************************

शहरातील घुटकाला प्रभागातील सम्राट अशोक चौकात मागील आठवड्यापासून मनपातील कर्मचाऱ्यांनी कचरा टाकणे सुरू केले, मनपा कर्मचाऱ्यांचा हा कारनामा बघून काही नागरिक त्याठिकाणी कचरा टाकायला लागले आहे.

***************************

याबाबत अनेक नागरिकांनी चंद्रपूर मनपात तक्रारी दिल्या, पण त्या तक्रारीचे निराकरण करण्यात आले नाही, मात्र आज काही नागरिकांनी मनपातील बोरकर यांना याबाबत सांगितले असता आम्ही त्याठिकाणी साफसफाई केली असल्याचे सांगितले मात्र आतासुद्धा तिथे तो कचरा त्याच अवस्थेत पडलेला आहे.
चंद्रपूर मनपामुळे या पावसाळ्यात नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे, केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत मनपा ठिकठिकाणी बॅनर लावत आम्ही शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात सफाई मोहीम राबवितो असे मुद्रित असते मात्र हे चित्र बघून सत्यता काही औरच दिसते.

**************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

****************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here