*खासगी रुग्णालयांना दर पत्रक लावणे बंधनकारक :*

0
89

******************************

Nilesh Thakre  9371321070  

*********************

* अधिक बिल आकारले तर पाहा ! *

****************************

*डॉक्टरसाहेब, समोरच दरपत्रक लावा नाही तर कारवाई हाेणार !* 

*****************************

चद्रपुर – बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार प्रत्येक खासगी रुग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक लावणे आवश्यक आहे.. प्रत्यक्षात मात्र चंद्रपुर येथे माेठ्या प्रमाणात मल्टिस्पेशलिटी रूग्णालय असुन कुठे ही रूग्णालयाचा ठिकाणी दरपत्रक अजुन पर्यंत लावण्यात आलेले नाही. त्यामुळे थेट रुग्णालयातून सुटी होतानाच जनरल रूम, स्पेशल रूमसह ICU चे विविध सेवांचे दर समोर येतात व रूग्णांचा नातेवाईकांना लाखाे रूपयेयाचे बिल देण्यात येते. त्यातून अनेकदा रूग्णालयातील कर्मचारी तसेच डॉक्टर व रूग्णांच्या नातेवाईकांन साेबत वादही होतात. डॉक्टरांनकडुन रुग्णांच्या नातेवाइकांकडून उपचाराचे अधिक बिल घेतल्याच्या तक्रारी नेहमिच ऐकायला मिळतात. सर्वच खासगी रुग्णालयांना त्यांच्या आवारात दर्शनी भागात उपचार व सेवेचे दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. पण चंद्रपुरात कुठले ही रुग्णालये दरफलक लावण्या पासून दूरच आहेत.

*************************

रुग्णालयांची नोंद
बघता चंद्रपुरात
जिल्ह्यात सर्वाधिक खासगी रुग्णालयाची नाेंद असुन ती शहरात सुद्धा आहे. चंद्रपुरात शहरात शंभरते दिडशे खासगी रुग्णालये आहेत, तर ग्रामीण भागात तालुका स्तरावर शंभर खासगी रुग्णालये दिसुन येतील.
*कारवाईचे अधिकार कोणाला?*

**********************

शहरातील खासगी रुग्णालयांनी दर्शनी भागात दरपत्रक लावले नाही, तर त्यांच्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कारवाई केली जाते. अजुनपर्यत या विषया बाबत चंद्रपुर जिल्ह्यात महापालिकेनी कुठल्या ही खाजगी रूग्णालयावर कारवाही केलेली आहे अशी तरी माहीती जनतेच्या निर्दशनास आलेली नाही.

***************************

* मात्र खाजगी रूग्णालयात खरच दरपत्रक लावले जातात का-? याची सहानिशा चंद्रपुर महापालिकेकडुन कधीच केल्या गेलेली नाही हे तेवढेच खरे  *

*************************

*चंद्रपुरात कुठल्याच
खाजगी मल्टिस्पेशलिटी रुग्णालयांत  दर पत्रक नाही* 

****************************

चंद्रपुरात शहरातील कस्तुराबाराेड ते माहात्मा गांधी मार्गाच्या जवळच्या परिसरातील पाच ते दहा रुग्णालयांची पाहणी करण्यात आली. यात एक ही रुग्णालयांत दरपत्रक दिसून आलेले नाही किंवा कुठेही दरपत्रक ठळकपणे दिसले नाही.
एकाद्या रुग्णालयात अगदी छोटया आकारात दरपत्रक लावण्यात आलेले असतील सुध्दा पण, अगदी जवळ जाऊनच त्यावरील दर पाहावे

***********************

* बिल देतांना अंकाउंटने केवळ बिलाची रक्कम न सांगता दरपत्रकासहित सवीस्तर माहिती देणे गरजे आहे. *

***********************

नातेवाइकांना बिल देताच बहुतांश जण काउंटरवर जाऊन पैशांचा भरणा करतात. प्रत्यक्षात दर किती आहे आणि किती आकारले, याची अनेक जण पडताळणीच करीत नाहीत.

***************************

*खाजगी रग्णालयांना दरपत्रक लावणे बंधनकारक* 

***************************

खाजगी रुग्णालयात दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. रुग्णालयांनी दर्शनी भागात हे दरपत्रक लावण्याचे निर्देश चंद्रपुर जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी यांना आवाज़ संघटनेच्या वतीने एका शिष्ट मंडळांनी भेट देवुन केलेली आहे. त्यासंदर्भात प्रत्येक रुग्णालयाला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सूचना करण्यात आलेली आहे कि नाही हे माहित नसुन खाजगी रूग्णालयाचा हा हेकेखाेर पणा व रूग्णानांची हाेणारी आर्थिक लुट थांबायला हवी. रूग्णालयात रूग्णांना डिस्टार्ज घेतांना रूग्णालयाकडुन किती बिल आकारण्यात आले ( द चार्टर ऑफ पेशंट राईट्स ) च्या माध्यमातुन माहीती देणे हे रूग्णांचा हक्क आहे हे विशेष….

*************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

**************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here